Join us  

बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 3:18 PM

Girls Romance To ‘Ang Laga De’ While Riding A Scooter On Holi, Video Goes Viral : चालत्या स्कूटरवर रोमान्स करणं मुलींना पडलं महागात, ३३ हजारांचा बसला दंड आणि..

सोशल मिडीयावर व्हायरल होण्यासाठी, लोकं कोणत्या थराला जाऊन व्हिडिओ शूट करतील सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे (Holi 2024). ज्यात एक मुलगा स्कुटी चालवत असून, मागे दोन मुली एकमेकांना बिलगून होळीचा रंग लावताना दिसत आहे. शिवाय अश्लील हावभाव करताना दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओत 'गोलियों की रासलीला राम लीला' (Ram Leela) चित्रपटातील 'अंग लगा दे' हे गाणेही पार्श्वसंगीत म्हणून वाजते (Social Viral). काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली स्कुटरवरची मुलगी दोन वेळा पडता-पडता वाचताना दिसते. पण मग पोलीसांनीही या मुलींना चांगलाच धडा शिकवला(Girls Romance To ‘Ang Laga De’ While Riding A Scooter On Holi, Video Goes Viral).

'अंग लगा दे' म्हणत मुलींचे चालत्या स्कुटीवर अश्लील कृत्य

पांढरी मिरी कधी खाऊन पाहिली आहे का? ब्लड प्रेशर ते लठ्ठपणापर्यंतच्या आजारावर खास उपाय, तज्ज्ञ सांगतात..

दिल्ली मेट्रोमधील २ मुलींचा होळीनिमित्तचा व्हिडिओ व्हायरल होताच, नोएडामधील २ मुलींचा चालत्या स्कुटीवरील असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा स्कूटर चालवत आहे, तर दोन मुली दुचाकीवर समोरासमोर बसल्या आहेत. मुली एकमेकांना बिलगून होळीचा रंग लावत असून, अश्लील हावभाव देताना दिसून येत आहे. शिवाय स्कुटीच्या काठाशी बसलेली काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली एक मुलगी, स्टंट करताना दुचाकीवरून पडता पडता वाचली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.

नोएडा पोलिसांनी घेतली दखल, आकाराला 'इतक्या' हजारांचा दंड

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

नोएडा पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत, व्हिडिओमध्ये असणाऱ्या तिघांना ३३,००० दंड ठोठावला आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मुलींवर कारवाई केल्याबद्दल नोएडा पोलिसांचे आभार मानले. तर काहींनी कमेण्ट करून जास्त दंड आकारला असल्याचे सांगितले. तर काहींनी 'मुलींवर योग्य ते कारवाई करा' असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :होळी 2024सोशल व्हायरलसोशल मीडिया