Lokmat Sakhi >Beauty > ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

How To Remove Blackheads Fast and Easy by using Toothpaste : २ घरगुती उपायांनी मुळापासून निघतील ब्लॅकहेड्स; ब्यूटी पार्लरचा खर्चही वाचेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 11:47 AM2024-03-26T11:47:26+5:302024-03-26T11:48:08+5:30

How To Remove Blackheads Fast and Easy by using Toothpaste : २ घरगुती उपायांनी मुळापासून निघतील ब्लॅकहेड्स; ब्यूटी पार्लरचा खर्चही वाचेल..

How To Remove Blackheads Fast and Easy by using Toothpaste | ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

नाकावर ब्लॅकहेड्स येणं हे खूप कॉमन आहे (Blackheads). वाढतं वय, प्रदूषण, धूळ हे आपल्या त्वचेवर बसतात. ही घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन साचतात. ज्यामुळे ब्लॅकहेड्स निर्माण होतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स जास्त असतात, कारण त्वचेवरील तेलामुळे घाण त्वचेवरच चिकटून राहते (Skin Care Tips). शिवाय मुरूम यासह इतर स्किनच्या निगडीत समस्या निर्माण होणं सामान्य आहे (Toothpaste).

चेहऱ्याच्या एका धुण्यात ब्लॅकहेड्स निघत नाही. ते काढण्यासाठी बऱ्याच महिला ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन खर्च करतात. पण ब्यूटी पार्लरमध्ये न जाताही घरीच आपण ब्लॅकहेड्स काढू शकता. फक्त टूथपेस्टचा वापर करून ब्लॅकहेड्स काढण्यात येऊ शकते. ते कसे? टूथपेस्टचा वापर करून ब्लॅकहेड्स निघतात का? पाहूयात(How To Remove Blackheads Fast and Easy by using Toothpaste).

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करावा?

लागणारं साहित्य

टूथपेस्ट

मीठ

उन्हाळ्यात शरीराला गारवा देते कैरी-खोबऱ्याची चटकमटक चटणी; चवीला चटपटीत - करा ५ मिनिटात

लिंबाचा रस

ब्लॅकहेड्स रिमुव्हल क्रीम तयार करण्याची पद्धत आणि लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम, एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा टूथपेस्ट घ्या. त्यात चिमुटभर मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण ही तयार पेस्ट नाकावर आणि हनुवटीवर लावून २ ते मिनिटांसाठी बोटाने घासा. ५ मिनिटानंतर आपण चेहरा पाण्याने धुवू शकता. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे नक्कीच ब्लॅकहेड्स निघतील. शिवाय चेहरा क्लिन दिसेल.

केसांची वाढ खुंटली-वेणी शेपटीसारखी दिसते? तांदुळाच्या पाण्यात मिसळा २ गोष्टी; वेणी होईल जाड..

बेकिंग सोडा आणि लिंबू

आपण बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करूनही ब्लॅकहेड्स काढू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि कोमट पाणी घालून मिक्स करा. पेस्ट नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. यासह त्वचेला संसर्गापासून वाचवते. याचा वापर थेट नाकावर आणि हनुवटी करा. नंतर १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Web Title: How To Remove Blackheads Fast and Easy by using Toothpaste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.