Girls Viral Video : आजकाल सोशल मीडियावर 'पापा की परी' या लाइनसोबत तरूणींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बाइकवर स्टंट करणाऱ्या किंवा रस्त्यावर रील्स बनवणाऱ्या तरूणींबाबत ही लाइन वापरली जाते किंवा त्यांची खिल्ली उडवण्यासाठी वापरली जाते. पण याच व्हिडिओंना उत्तर देणारा एक दुसरा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हाला या मुलीचं कौतुकही वाटेल आणि तुम्ही इमोशनलही व्हाल.
देशात एकीकडे वडिलांच्या लाडात वाढलेल्या काही मुली असतात, तर दुसरीकडे काही अशा मुली असतात ज्यांचा जीवनाचा संघर्ष फारच मोठा असतो. आताचा काळ हा महिला-पुरूषांनी बरोबरीत चालण्याचा आहे. त्यामुळे एखादी गोष्टी मुली करू शकत नाही, असं कुणी म्हणू शकत नाही. आजकाल मुली रिक्षापासून ते विमानापर्यंत सगळ्यात गोष्टी चालवू शकतात. अशाच एका मुलीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात एक मुलगी रिक्षा चालवताना दिसत आहे आणि या व्हिडिओच्या कॅप्शनला हिंदीत लिहिलं आहे की, "हर लड़की अपने पापा की परी नहीं होती, कई बेटियों पर ज़िम्मेदारियों का बोझ होता है."
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर single__step_foundation नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. तसेच अनेकांनी मुलीचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. कुणीतरी आपला व्हिडीओ काढत असल्याचं जेव्हा या मुलीला दिसलं तेव्हा ती खूप मेहनतीचं काम करत असतानाही सुंदर हसली. जे अनेकांना खूपच आवडलं.