Lokmat Sakhi >Social Viral > जेनेलिया डिसुझा म्हणते मी 'हेलीकॉप्टर मॉम' नाही; म्हणून करिअरमध्ये ब्रेक घेतला! 'हेलीकॉप्टर मॉम' म्हणजे?

जेनेलिया डिसुझा म्हणते मी 'हेलीकॉप्टर मॉम' नाही; म्हणून करिअरमध्ये ब्रेक घेतला! 'हेलीकॉप्टर मॉम' म्हणजे?

Genelia D'souza Says That She Don't Want To Be A Helicopter Mom: जेनेलिया डिसुझा सांगतेय तशी हेलीकॉप्टर मॉम म्हणजे नेमकं काय असतं तुम्ही तर तशा आई नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 14:04 IST2025-07-26T14:03:21+5:302025-07-26T14:04:46+5:30

Genelia D'souza Says That She Don't Want To Be A Helicopter Mom: जेनेलिया डिसुझा सांगतेय तशी हेलीकॉप्टर मॉम म्हणजे नेमकं काय असतं तुम्ही तर तशा आई नाही ना

Genelia D'souza says i took long break in carrier because i dont want to be a helicopter mom for my kids, what is helicopter mom? | जेनेलिया डिसुझा म्हणते मी 'हेलीकॉप्टर मॉम' नाही; म्हणून करिअरमध्ये ब्रेक घेतला! 'हेलीकॉप्टर मॉम' म्हणजे?

जेनेलिया डिसुझा म्हणते मी 'हेलीकॉप्टर मॉम' नाही; म्हणून करिअरमध्ये ब्रेक घेतला! 'हेलीकॉप्टर मॉम' म्हणजे?

Highlightsआपण आईपणाचा थँकलेस जाॅब आनंदाने स्विकारला आणि कामातून मोठा ब्रेक घेतला असं जेनेलिया सांगते. 

जेनेलिया डिसुझा ही एक गुणी अभिनेत्री. दाक्षिणात्य चित्रपटात तर तिचा विशेष दबदबा होता. तिकडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं आहे. बॉलीवूडमध्ये येऊन तिथेही तिने तिचा ठसा उमटवला. त्यानंतर मग लग्न, मुलं या सगळ्या गोष्टींमध्ये ती गुंतून गेली आणि चित्रपट सृष्टीपासून थोडी दुरावली. तब्बल १० वर्षांचा तिचा ब्रेक झाला. त्यानंतर मात्र तिने बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक केले असून आमीर खान सोबतचा तिचा चित्रपट खूप गाजतो आहे. तिच्या कामाचं कौतूक होत आहे. पुन्हा एकदा ती प्रकाशझोतात आली आहे. मुलं झाल्यानंतर कित्येक वर्किंग वुमनची अवस्था जेनेलियासारखी होते. कामातून त्यांना ब्रेक घेऊन मुलांकडे लक्ष द्यावेच लागते. अशा सगळ्याच महिलांसाठी जेनेलियाचा कमबॅक हे एक उत्तम प्रेरणादायी उदाहरण ठरू शकते.(Genelia D'souza Says That She Don't Want To Be A Helicopter Mom)

 

जेनेलिया डिसुझा म्हणते मला हेलीकॉप्टर मॉम व्हायचं नव्हतं..

घर, मुलं, करिअर, ब्रेक आणि कमबॅक याच अनुशंगाने जेनेलिया एका टॉक शोमध्ये बोलली होती. त्या मुलाखतीचा एक छोटासा भाग shailichoprashow या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

श्रावणी सोमवार विशेष रांगोळी डिझाईन्स! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येईल सुंदर रांगोळी

यामध्ये जेनेलिया म्हणते की माझ्या करिअरमध्ये एवढा मोठा ब्रेक झाला की त्या काळात मला अनेकांनी सांगितलं की आता तुझं करिअर संपलं, लोक तुला विसरणार.. पण मी काय करते आहे आणि ब्रेक का घेतला आहे हे मला माहिती होतं त्यामुळे मी शांत होते. मुलं लहान असल्याने त्यांना आई म्हणून माझी गरज होती. मला असं वाटतं की मुलं एका विशिष्ट वयाची होईपर्यंत त्यांना प्रत्येक गोष्टीत आई हवी असते. आई आणि मुलांचं नात घट्ट होण्यासाठी आईने त्या वयात त्यांच्या आसपास असणं खूप गरजेचं असतं. मी तेच केलं. 

 

मला मुलांनी दिवसभर काय केलं, त्यांचा दिवस कसा गेला हे सगळं सगळं त्यांच्या सोबतीने अनुभवायचं होतं. मला 'हेलीकॉप्टर मॉम' व्हायचं नव्हतं.. हेलीकॉप्टर मॉम म्हणजे अशी आई जी कायम कामात गुंतलेली असते.

पायाचे घोटे काळवंडून घट्टे पडले? १ सोपा उपाय- टॅनिंग, डेडस्किन जाऊन पाय स्वच्छ होतील

मुलांसाठी तिच्याकडे फारसा वेळ नसतोच.. त्यामुळेच नेहमीच गडबडीत ती मुलांची चौकशी करते आणि कामाला निघून जाते... हल्ली कित्येक वर्किंग आईची अवस्था अशीच झाल्यासारखी वाटते. हेच नेमकं जेनेलियाला नको होतं म्हणून आपण आईपणाचा थँकलेस जाॅब आनंदाने स्विकारला आणि कामातून मोठा ब्रेक घेतला असं जेनेलिया सांगते. 


 


 

Web Title: Genelia D'souza says i took long break in carrier because i dont want to be a helicopter mom for my kids, what is helicopter mom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.