लोकांचे केस नैसर्गिकरित्या काळे, तपकिरी, राखाडी किंवा पांढरे असतात. आजची तरुण पिढी म्हणजेच 'जेन झी'साठी फॅशन आणि स्टाईल केवळ कपड्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. ही पिढी विविध हेअर कलर्सना आपलं व्यक्तिमत्व अधिक खुलवण्याचं माध्यम मानत आहे. आजकाल विशेषतः तरुणांमध्ये केसांना वेगवेगळ्या रंगात रंगवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
निळा, लाल, सोनेरी आणि जांभळा यासारखे आकर्षक रंग तरुणांची ओळख बनत आहेत. केसांच्या रंगावरून व्यक्तीच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्वाचे संकेत मिळतात. केवळ केसच नव्हे, तर शरीराच्या विविध अवयवांच्या रचनेवरूनही माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. तरुणांमध्ये ट्रेंड होत असलेल्या हेअर कलर्सबाबत जाणून घेऊया...
ब्लू हेअर कलर (निळा रंग)
तरुण पिढी आपल्या केसांना निळ्या रंगात रंगवणं अधिक पसंत करत आहे. असे लोक कल्पक स्वभावाचे असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यावर आणि प्रयोग करण्यावर विश्वास असतो. अशा व्यक्तींमध्ये कला, संगीत किंवा डिझाइन यांसारख्या क्षेत्रांत अधिक रुची दिसून येते. म्हणूनच हे लोक गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करतात.
रेड हेअर कलर (लाल रंग)
केसांमधील लाल रंगाचा ट्रेंड ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानला जातो. ज्यांना लाल रंग आवडतो ते लोक धाडसी आणि नेतृत्व क्षमता असलेले असतात. अशी माणसं कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायला घाबरत नाहीत. मात्र कधीकधी यांचा स्वभाव थोडा रागीट किंवा आक्रमक असू शकतो.
गोल्डन हेअर कलर (सोनेरी रंग)
गोल्डन म्हणजेच सोनेरी रंगाचे केसही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत. असं मानलं जातं की, ज्यांना सोनेरी रंग आवडतो त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतं. हे लोक सामाजिक जीवनात एक्टिव्ह असतात आणि इतरांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात.
पर्पल किंवा इतर युनिक कलर्स (जांभळा किंवा अनोखे रंग)
नवीन पिढीतील तरुण केसांना जांभळा, हिरवा किंवा चंदेरी (सिल्व्हर) यांसारखे हटके रंग देण्याचं धाडस करतात. असे लोक स्वतंत्र विचारांचे असतात. पारंपारिक नियमांच्या पलीकडे जाऊन आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यांच्यामध्ये प्रचंड कल्पकता आणि आत्मविश्वास पाहायला मिळतो.
Web Summary : Gen Z embraces hair color as self-expression. Blue indicates creativity, red signifies confidence, golden suggests charm, and purple reflects uniqueness. Hair color reveals personality traits.
Web Summary : जेन Z हेयर कलर को आत्म-अभिव्यक्ति के रूप में अपनाता है। नीला रंग रचनात्मकता, लाल रंग आत्मविश्वास, सुनहरा रंग आकर्षण और बैंगनी रंग विशिष्टता को दर्शाता है। बालों का रंग व्यक्तित्व के लक्षणों को प्रकट करता है।