Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > संध्याकाळ होताच घरभर डासांचा उच्छाद? 'हे' १ छोटंसं रोप घरात ठेवा, डास घरात शिरणार नाहीत

संध्याकाळ होताच घरभर डासांचा उच्छाद? 'हे' १ छोटंसं रोप घरात ठेवा, डास घरात शिरणार नाहीत

How To Remove Mosquito From House : डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खिडक्यांना जाळी लावून घ्या. घरात अस्वच्छता ठेवू नका.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:09 IST2025-09-17T10:02:55+5:302025-09-17T18:09:48+5:30

How To Remove Mosquito From House : डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खिडक्यांना जाळी लावून घ्या. घरात अस्वच्छता ठेवू नका.

Gardening Experts Secret Tricks To Grow Lemongrass Plants For Keep Mosquito Away From House Naturally | संध्याकाळ होताच घरभर डासांचा उच्छाद? 'हे' १ छोटंसं रोप घरात ठेवा, डास घरात शिरणार नाहीत

संध्याकाळ होताच घरभर डासांचा उच्छाद? 'हे' १ छोटंसं रोप घरात ठेवा, डास घरात शिरणार नाहीत

घरात डास येण्याची समस्या प्रत्येक घरात दिसून येते.  संध्याकाळ होताच घरात डास शिरतात. डास चावले की पुरळ येतात आणि अंगाला बराचवेळ खाज येत असते. घराला नैसर्गिकरित्या सुरक्षित ठेवण्यासाठी एक खास रोप तु्म्ही घरात ठेवायला हवं. लेमनग्रास प्लांट त्याच्या तीव्र वासासाठी प्रसिद्ध आहे. ज्याचा सुगंध डासांना जराही आवडत नाही.  (Gardening Experts Secret Tricks To Grow Lemongrass Plants For Keep Mosquito Away From House Naturally)

लेमनग्रासचे रोप फक्त डासांना घरात शिरण्यापासून रोखत नाही तर याच्या पानांच्या वापर तुम्ही चहातही करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेमनग्रासचं रोप उगवणं एकदम सोपं आहे. वर्षभरात तुम्ही कधीही ही रोपं लावू शकता. गार्डनिंग एक्सपोर्ट पंकज मौर्या यांनी सिक्रेट पद्धत सांगितली आहे ज्यामुळे रोपांची वाढ सहज होण्यास मदत होईल.

परफेक्ट माती तयार करणं

कोणतंही रोप उगवण्यासाठी माती तयार करणं गरजेचं असतं. या रोपासाठी ५० टक्के खत आणि ५० टक्के सामान्य माती योग्य पद्धतीनं मिसळा. शेणखत मातीला पोषक तत्व देते.  या दोन्ही मिश्रणांनी रोपांची वाढ चांगली होते. हे रोप उगवण्यासाठी कटिंगचा वापर करू शकता. रोपातील सुकलेली पानं काढून टाका. असं केल्यानं रोपाची सर्व पानं व्यवस्थित मोठी होतात. रोप लावण्यासाठी सुरूवातीला एक छोटी ग्रो बॅग तयार करा. थेट कुंडीत लावू नका. कारण यामुळे रोपांची वाढ थांबू शकते. यामुळे रोपाची मुळं मजबूत होतात. माती हलकी दाबून घ्या. 

करिना कपूर आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पाहा कायम फिट ठेवणाऱ्या पौष्टिक खिचडीची रेसिपी

 हे रोप दाट हेल्दी ठेवण्यासाठी ऊन आणि पाण्याची विशेष काळजी घ्या. गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नका.  डासांना पळवण्यासाठी तुम्ही लेमनग्रासच्या सुकलेल्या पानांचा जाळून त्याचा धूर करू शकता. यामुळे सुगंध  चांगला येईल याचा चहा करूनही तुम्ही पिऊ शकता. याशिवाय  डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खिडक्यांना जाळी लावून घ्या. घरात अस्वच्छता ठेवू नका. घरात उघड्यांवर कोणतंही पाणी ठेवू नका. त्यामुळे डास अधिकच वाढण्याची शक्यता असते.

Web Title: Gardening Experts Secret Tricks To Grow Lemongrass Plants For Keep Mosquito Away From House Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.