Join us

Funny Viral Video : 'पप्पा Sorry बोला ना'  चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल, शेवट चुकवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 16:23 IST

Funny Viral Video : या व्हिडिओमध्ये या मुलीनं तिच्या वडीलांकडे मागणी लावून धरलेली असते.

लहान मुलांच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ आपल्याला खूप  हसवतात तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मन भावूक होतं. सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी आपल्या वडिलांकडे सॉरी बोलण्यासाठी हट्ट करते. तिचं निरागसं वागणं नेटिझन्सच्या चेहर्‍यावर हसू फुलवत आहे. (Funny Viral Video of little girl convincing her father)

या व्हिडिओमध्ये या मुलीनं तिच्या वडिलांकडे मागणी लावून धरलेली असते.   वडिलांनी तिला सॉरी बोलावं अशी तिची भाबडी इच्छा असते.  तिच्या बोबड्या बोलांनी ती सॉरी म्हणण्यामागचं कारण सांगत असते.  ज्यावेळी ती कारण सांगते तेव्हा खूप हसू येतं आणि तिची किवसुद्धा येते. 

तिचे पालकही तिला सॉरी बोलतात. व्हिडिओमध्ये शेवटचं  वाक्य खूप हसवणारं आहे.  ते वाक्य ऐकून नेटिझन्स पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आपल्या घरातल्या लहान मुलांची आठवण आली आहे. गौरव हरल या सोशल मीडिया युजरनं हा व्हिडिओ यु ट्यूबवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओतील चिमुरडीचा पांढरा फ्रॉक आणि छोटीशी टिकली खूपच सुंदर, क्यूट वाटते.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल