Join us

Funny Viral Photo : लग्न म्हणजे काय? शाळकरी मुलाचा निबंध वाचून शिक्षक झाले चकीत.. वाचा हा भन्नाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:53 IST

Funny Viral Photo : सोशल मीडियावर शाळेच्या मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून कधी कधी खूप हसायला येतं आणि लोक त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा येतात.

प्रत्येक व्यक्तीला  त्याचं शालेय जीवन आयुष्यभर लक्षात राहणारं असतं. शाळेचे दिवस, मस्ती, खोडकरपणा सगळंच  न विसरता येण्यासारखं असतं. (What is marriage, student gave funny answer) शाळकरी मुळं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात. खासकरून ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मुलं जे काही डोकं वापरतात त्याचा परिणाम खूपच विनोदी असतो. 

सोशल मीडियावर शाळेच्या मुलांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात जे पाहून कधी कधी खूप हसायला येतं आणि लोक त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा येतात. (What is marriage? After reading the student’s essay, the teacher said, come and meet)  सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थानं  लिहिलेल्या निबंधाचा फोटो व्हायरल होत आहे. या मुलानं अतिशय विनोदी पद्धतीनं सादरीकरण केलं आहे. शिक्षकांनी लग्न म्हणजे काय असा प्रश्न विचारून मुलांना निबंध लिहिण्यास सांगितले.

एका विद्यार्थ्यानं लग्नाबद्दल असं काही लिहिले जे वाचल्यानंतर सगळेचजण चकीत झाले. शिक्षकांनाही हा निबंध फारसा आवडला नाही.  व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसून येतंय की  शिक्षकांनी या निबंधाला दहा पैकी शुन्य गुण दिले आहे. इतकंच नाही तर नॉनसेंस मला येऊन भेट असंही त्यांनी इंग्रजीत या पेपरवर लिहिलं  आहे.

निबंधात असं काय होतं?

या निबंधात मुलानं लिहिलं की, जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीचे घरचे तिला सांगतात की तू आता मोठी झाली आहेस तुला आम्ही आता खायला देऊ शकत नाही. तुझं पोट भरणारा मुलगा मिळाला तर फार बरं होईल. मग ती मुलगी एका पुरूषाला भेटते. ज्याचे आईवडील त्याला लग्नासाठी फोर्स करत असतात आणि म्हणतात ही मोठा झाला आहे. ते दोघंही एकमेकांची परिक्षा घेतात आणि एकत्र, आनंदी राहू लागतात. @srpdaa या ट्विटर युजरनं हा फोटो शेअर केल्यापासून तुफान चर्चेत आहे.  या निबंधाला  १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया