आजकाल तरुणांसाठी नोकरी ही फक्त एक करिअर नाही, तर ती कुटुंबाचं पालनपोषण करण्याचं एक साधन देखील आहे. पण जर ऑफिसचं वातावरणच चांगलं नसेल तर त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशी एका कर्मचाऱ्याची गोष्ट समोर आली आहे. ज्याने त्याच्या बॉस आणि कंपनीच्या धोरणांना कंटाळून राजीनामा दिला जो आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
JAY Decor नावाच्या एका कंस्ट्रक्शन कंपनीने एका कर्मचाऱ्याचं राजीनामा लेटर शेअर केलं. इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. AC Minza असं या कर्मचाऱ्याच नाव आहे. त्याने स्पष्ट लिहिलं, "सर, मी राजीनामा देत आहे कारण या कंपनीत फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही. मी काम करतो, जादू नाही." या लेटरवर कंपनीचा अधिकृत स्टँप मारण्यात आला होता.
कंपनीने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आम्हाला आज हे राजीनामा लेटर मिळालं. आम्हाला शंका आहे की ते विनोद म्हणून लिहिले गेलं आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केले गेलं आहे कारण ते ऑफिस डायरीतील एका पानावर लिहिलेलं दिसतं, राजीनामा सहसा साध्या कागदावर लिहिला जातो किंवा ईमेलद्वारे पाठवले जातो." त्यांनी स्पष्ट केलं की ते त्याची सत्यता पडताळू शकत नाहीत.
पोस्ट काही तासांतच जोरदार व्हायरल झाली आणि त्याला १६,००० हून अधिक लाईक्स आणि १०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी ती सेव्ह केली. तर काहींनी तरुणाचीच बाजू घेतली. "हा माणूस अगदी बरोबर आहे. जर पगार वाढत नसेल तर टार्गेट का वाढवायचे?" असं म्हटलं. तर "जर इन्क्रीमेंट होत नसेल तर टार्गेट वाढवणं निरर्थक आहे" असं देखील लोक म्हणत आहे.
कंपनी याला विनोद म्हणून हाताळत आहे, परंतु या राजीनाम्यामुळे एक महत्त्वाचं सत्य समोर आलं आहे, कामाचा ताण, टार्गेट वाढलं तरी पगार वाढत नाही. कर्मचाऱ्यांना मशीन असल्यासारखं वाटू लागतं आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. या घटनेने सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं आहे की कंपन्यांनी त्यांचे टार्गेट वाढवण्यापूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि मानसिक आरोग्याचा देखील विचार करावा.