Join us

पाच किचन हॅक्स... जे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2025 19:45 IST

Five Kitchen Hacks For You : काही हॅक्स ज्या आहेत फारच उपयोगी.

आपण काही ना काही किचन हॅक्स शोधत असतो. सोप्या सोप्या गोष्टी असतात, पण आपल्याला माहिती नसतात. ज्यांच्यामुळे आपले आयुष्य सोयीस्कर होईल, अशा गोष्टींपैकी एक म्हणजे किचन हॅक्स. आपण गप्पा मारताना सुद्धा एकमेकींना असे हॅक्स विचारत असतोच.छोट्या मोठ्या समस्यांसाठी असे हॅक्स मैत्रिणींशी शेअर करत असतो. तुमच्यासाठी उपयोगी अशा पाच किचन हॅक्स आहेत. जाणून घ्या कोणत्या ते.(Five Kitchen Hacks For You)

१ . काकडी बरेच दिवस टिकते खराब होत नाही. पण दोन दिवसातच आकसलेली दिसायला लागते. अशी काकडी बरेच जण खराब झाली असं समजतात. पण ती काकडी थोडावेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा. ती पुन्हा आधी सारखा ताजी दिसायला लागते. शिवाय जास्त काळ टिकते. (Five Kitchen Hacks For You)

२ . सकाळी केलेल्या पोळ्या दुपारीपर्यंत कडक होऊन जातात. ही समस्या तर प्रत्येकाची आहे. कपड्यात गुंडाळल्या की जास्त चामट होतात. मग करावे तरी काय? एक फारच सोपा उपाय आहे. पोळ्यांच्या डब्यात आल्याचा तुकडा ठेवा. असं केल्याने पोळ्या छान मऊ राहतात.

३. बरेचदा बटाटा फार गोड मिळतो. असा बटाटा भाजीत तर अजिबात चांगला लागत नाही. अशा वेळी गोड बटाटा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा आणि मग वापरायचा. असं केल्याने बटाट्याचा गोडवा कमी होतो. (Five Kitchen Hacks For You)  

४. कांदा चिरायला लागल्यावर डोळ्याला पाण्याच्या धारा लागतात. डोळे झोंबतात. कांदा चिरताना चॉपिंग बोर्डवर  ओला टिशू पेपर ठेवा. जर कांदा ताटात चिरत असाल तर, ज्या ताटात चिरत आहात त्या ताटात ठेवा. असं केल्याने डोळ्यांना कांदा झोंबत नाही. तसेच डोळ्यातून पाणी पण येत नाही.

५. बरेचदा गार पाणी प्यायची इच्छा होते. आणि गार पाण्याच्या बाटलीतही पाणी थोड्या वेळासाठीच गार राहते. जास्त काळासाठी पाणी गार राहावे असे वाटत असेल तर, बाटलीला अॅल्युमिनियम फॉइल पेपर लावून ठेवायचा. पाणी दिवसभर गारच राहते.    

आता हे हॅक्स करून बघा. तुम्हाला उपयोगी वाटल्यावर तुमच्या मैत्रिणींना देखील सांगा. 

टॅग्स :किचन टिप्सकांदाअन्न