Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video

नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video

Video - ढसाढसा रडणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शाळा व्यवस्थापनावर महिलेने अनेक आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:33 IST2025-12-22T14:33:22+5:302025-12-22T14:33:43+5:30

Video - ढसाढसा रडणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शाळा व्यवस्थापनावर महिलेने अनेक आरोप केले आहेत.

female teacher alleges that she was harassed at school teacher job video viral | नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video

नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा अनेकदा समोर येत असतात. यावेळी एका शिक्षिकेने तिला शाळेत कशी वागणूक दिली जाते आणि कशा प्रकारे त्रास दिला जातो हे सांगितलं आहे. ढसाढसा रडणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शाळा व्यवस्थापनावर महिलेने अनेक आरोप केले आहेत.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका रस्त्यावरून चालताना सेल्फी व्हिडीओ बनवत शाळेत जात असल्याचं दिसते. ती म्हणते की, "आज मी शाळेत राजीनामा देणारच आहे" असं बोलताना या महिलेला रडू कोसळतं. शाळेत आपला छळ केला जातो, असा आरोप तिने केला आहे. तिच्या अनुपस्थितीत तिचे क्लास चेक केले जातात. याशिवाय, तिने आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक भेदभावाबद्दलही सांगितलं आहे.


"महिलेचा अपमान करतात"

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षिकेन लिहिलं की, "मी राजीनामा दिला कारण मी कमकुवत आहे असं नाही, तर शांत बसणं चुकीच्या लोकांना वाचवतं म्हणून मी हा निर्णय घेतला. जेव्हा 'पुरुष अधिकारी' एखाद्या महिलेचा अपमान करतात आणि त्याविरुद्ध कोणीही भूमिका घेत नाही, तेव्हा ते 'ऑफिस कल्चर' नसून 'जेंडर डिस्क्रिमिनेशन' आहे."

Video - तरुणीनं जे मांडलं ते अनेकांना पटलं; हाती १.४० लाखांचा iPhone तरी बसनं प्रवास, म्हणाली...

मानसिक आरोग्याबद्दल शिक्षिका काय म्हणाली?

महिलेने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, "जेव्हा तुम्ही दररोज अशा वातावरणात जगता, तेव्हा ते तुमच्या मानसिक आरोग्याला उद्ध्वस्त करते. मी अशा वर्कप्लेसपेक्षा स्वतःची निवड केली आहे, जिथे जबाबदारीपेक्षा आरामाला जास्त महत्त्व दिलं गेलं. मी कशी दिसते आणि कशी तयार होऊन शाळेत येते, यावरही मला बोललं जातं."

"बस पकडण्यासाठी पहाटे ४ वाजता उठते"

"मी बस पकडण्यासाठी पहाटे चार वाजता उठते आणि अर्धा तास बस स्टॉपवर उभी राहते. बसमध्ये बसायला जागाही मिळत नाही, मी उभी राहून प्रवास करते." या शिक्षिकेच्या व्यथेने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाबाबत पुन्हा एकदा नवीन वाद छेडला आहे. शिक्षिकेचा हा व्हिडीओ @lifeofswa नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला १.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Web Title : शिक्षिका का इस्तीफा, स्कूल में उत्पीड़न के आरोप लगाते हुए वीडियो में रोईं।

Web Summary : एक वायरल वीडियो में एक शिक्षिका ने रोते हुए स्कूल में उत्पीड़न और लैंगिक भेदभाव का आरोप लगाया, जिसके कारण उन्होंने इस्तीफा दे दिया। उन्होंने लगातार जांच, कम महत्व और अपनी उपस्थिति पर टिप्पणियों का सामना करने का आरोप लगाया। उन्होंने एक जहरीले कार्य वातावरण के मानसिक तनाव पर प्रकाश डाला और नौकरी से ऊपर कल्याण को प्राथमिकता दी।

Web Title : Teacher resigns, cries in video alleging school harassment, discrimination.

Web Summary : A teacher in a viral video tearfully claims harassment and gender discrimination at school, prompting her resignation. She alleges constant scrutiny, feeling undervalued and facing comments about her appearance. She highlights the mental toll of a toxic work environment and prioritizes well-being over the job.