अभिनेत्री फातिमा सना शेख नेहमीच वेगवेगळ्या भुमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता पुन्हा 'गुस्ताक इश्क' या चित्रपटामध्ये तिची प्रमुख भुमिका असणार आहे. वेगवेगळ्या भूमिका करताना कलाकारांना त्या व्यक्तिरेखेनुसार स्वत:मध्ये कित्येक बदल घडवून आणावे लागतात. काही बदल त्यांच्यासाठी चांगले असतात तर काही बदल केल्याने त्याचा परिणाम पुढे कित्येक वर्ष त्यांच्या आयुष्यावर दिसून येतो. असंच काहीसं फातिमा सनाचंही झालेलं आहे.(Fatima Sana Shaikh Reveals About Her Wrong Eating Habits)
आपल्याला माहितीच आहे की काही वर्षांपुर्वी तिचा आमीर खान सोबतचा 'दंगल' चित्रपट आला होता... या चित्रपटातील व्यक्तिरेखेची गरज म्हणून फातिमाला भरपूर वजन वाढवायचं होतं.
फेशियल करुनही चेहरा काळवंडलेलाच दिसतो? ५ चुका टाळा, तरच फेशियलचे पैसे होतील वसूल,चेहरा चमकेल
त्यासाठी तिचा डाएटही तशाच पद्धतीने तयार करण्यात आला होता आणि ती दिवसाला तब्बल २५०० ते ३००० हजार कॅलरी पोटात जातील एवढं जास्त खात होती. त्याशिवाय जवळपास रोजच तिचं दिड तास वर्कआऊट चालायचं. यामुळे व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार तिचं शरीर छान तयार झालं. काही दिवसांनी शुटिंग संपलं पण तरीही सनाची काहीतरी खात राहण्याची सवय काही सुटली नाही.
नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत सना म्हणते की आजही मला सतत काही ना काही खावं वाटतं. तासंतास खात बसू शकते. मला नेहमीच भूक लागल्यासारखं वाटतं. मला माहिती आहे की हे अतिशय चुकीचं आहे. पण मी स्वत:ला थांबवू शकत नाही.
लग्नासाठी पैठणी घ्यायची? बघा पैठणीमध्ये सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारे रंग- खरेदी होईल सगळ्यात भारी
मग पुन्हा मग तासंतास उपाशी राहून वाढतं वजन कंट्रोल करावं लागतं. कारण तिला बुलिमिया हा आजार झाला आहे. या आजारात मनुष्य सतत काहीतरी खातो आणि नंतर मात्र उलटी करून किंवा औषधी घेऊन खाल्लेलं अन्न बाहेर काढतो. हा एक प्रकारचा मानसिक त्रास आहे आणि सना सध्या त्याच त्रासातून जात आहे.
