सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी रात्री २ वाजता तिच्या वडिलांशी बोलत आहे. यावेळी तिचे वडील तिला करियरच्या प्रेशरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. वडिलांचे शब्द ऐकून मुलगी खूप भावुक झाली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
व्हायरल क्लिपमध्ये, मुलगी रात्री उशीरा फोनवर तिच्या वडिलांशी बोलत असताना खूप रडताना दिसत आहे. वडील म्हणतात, "बेटा, तू डॉक्टर झालीस तरच सगळं होईल, असं काही नाही. जगात अनेक चांगल्या नोकऱ्या आहेत. तुझं खूप वय झालेलं नाही, तू फक्त अजिबात प्रेशर घेऊ नकोस."
A young girl breaks down under heavy career pressure, but her father's calm and loving words give her strength.
— News Algebra (@NewsAlgebraIND) December 3, 2025
FATHER : "Don’t cry, beta. There are many jobs. Don’t come under pressure. Be happy"
"I am here for you, beta. I will earn for you" 🥹 pic.twitter.com/JvnOCkdDsW
वडिलांनी मुलीला असंही सांगितलं की, तिची व्हॅल्यू कोणत्याही एका करिअर मार्गातील यशाशी जोडलेलं नाही आणि तिला आर्थिक किंवा कुटुंबाच्या अपेक्षांबद्दल काळजी करण्याची गरज नाही असं आश्वासन दिलं. वडिलांनी आपल्या मुलीला पुढे सांगितलं की, जर तिला अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर तिने अभ्यास थांबवावा, पण प्रेशर घेऊ नये.
तू हुशार आहेस. भरपूर नोकऱ्या आहेत आणि मी अजून म्हातारा झालेलो नाही. घरी कोणी कमावणारा सदस्य नाही असं नाही. पैशांचा प्रॉब्लेम नाही. मी पैसे कमवेन, म्हणून काळजी करू नकोस असंही सांगितलं. हा व्हिडीओ ट्विटरवर एका युजरने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ जवळजवळ ५० हजार वेळा पाहिला गेला आहे.
