Join us

कमाल! बाप लेकीचा 'श्रीवल्ली' गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 13:27 IST

Father daughter dance together in bathroom on the song srivalli : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पोर्तुगीज पिता आणि मुलगी जोडी अल्लू अर्जुनच्या हिट 'पुष्पा' मधील 'श्रीवल्ली' गाण्यावर नाचताना, दोघेही हुक स्टेप्स करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलिज झालेल्या 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाला अजूनही चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ चित्रपटच नाही तर गाणीही सर्वांनाच पसंत पडत आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून प्रभावशाली लोकांपर्यंत, प्रत्येकजण आलू अर्जूनच्या डान्सची  कॉपी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता, एका बाप-लेकीच्या जोडीने 'पुष्पा' मधील लोकप्रिय 'श्रीवल्ली'  (Srivalli)  गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Father daughter dance together in bathroom on the song srivalli)

वडील आणि मुलीची ही जोडी पोर्तुगालच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. दोघेही अनेकदा बाथरूमच्या आरशासमोर उभे राहून नाचताना दिसतात. 'पुष्पा' या दाक्षिणात्य चित्रपटातील 'श्रीवल्ली' हे लोकप्रिय गाणे जगभरात सर्वांकडूनच पसंत केले जात आहे.

पोर्तुगालच नाही तर टांझानिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतही 'श्रीवल्ली' गाणं प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी हिट गाण्याची हुक स्टेप कॉपी केली पण एकत्र ट्विस्टही दाखवला. इंस्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हायरल व्हिडिओ 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पोर्तुगीज पिता आणि मुलगी जोडी अल्लू अर्जुनच्या हिट 'पुष्पा' मधील 'श्रीवल्ली' गाण्यावर नाचताना, दोघेही हुक स्टेप्स करताना दिसत आहेत.  त्यांनी त्यात स्वतःचा ट्विस्ट जोडला आहे. डान्सदरम्यान तो वेगवेगळ्या स्टेप्स करताना दिसत आहेत.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलनृत्य