Join us

बिजली बिजली गाण्यावर थिरकले बाप-लेक! भन्नाट डान्सवर पब्लिक फिदा, पाहा व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 16:22 IST

पंजाबी सिंगर हार्डी संधूचे गाण्यावरील डान्सचा जोरदार ट्रेंड; नेटीझन्स झाले क्रेझी

ठळक मुद्देया बाप लेकीचे ट्युनिंग एकदा पाहाच...पंजाबी गाण्याने लावले परदेशी नागरीकांनाही वेड..आणि थिरकली पावले...

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगाला जोडणाऱ्या या माध्यमामुळे आपण सगळेच जवळ आलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. याचेच उदाहरण म्हणजे परदेशी नागरीकांनी एका पंजाबी गाण्यावर केलेला डान्स आणि त्याचा व्हायरल व्हिडियो. प्रसिद्ध पंजाबी सिंगर हार्डी संधूचे बिजली बिजली हे गाणे सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडियो लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्याचे चित्र आहे. यामध्ये रिल्स करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. अनेकदा देशातीलच नाही तर परदेशातील नागरीकही बरेचदा भारतीय गाण्यांवर थिरकताना दिसतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात.

असाच बिजली बिजली या गाण्यावर आपल्या वडिलांबरोबर थिरकतानाचा एका लहानगीचा व्हिडियो इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल झाला आहे. ही लहानगी इतक्या शिताफीने डान्सच्या स्टेप्स करत आहे की पाहणारे तिच्या प्रेमात पडले आहेत. पाब्लोवेरेनिको या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा डान्सचा व्हिडियो शेअर करण्यात आला असून काही दिवसांत या व्हिडियोला १५ लाखांहून अधिक व्हयूज तर जवळपास दिड लाख लाईक्स मिळाले आहेत.     या मुलीचे नाव वेरेनिको असून तिच्या वडिलांचे नाव पाब्लो आहे. या दोघांचे डान्सचे ट्युनिंग अतिशय जबरदस्त असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. 

(Image : Google)

हे दोघे आरशात बघून डान्स करत असल्याचे व्हिडियोच्या शूटींगवरुन लक्षात येत आहे. भारतीय लोकांनी या व्हिडियोला विशेष पसंती दिली असून भारतीय गाण्यावर प्रेम केल्याबद्दल या परदेशी बाप-लेकीचे कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडियोला कॅप्शन देताना ‘भारतीय लोकांकडून मिळालेले प्रेम’ असे लिहीले आहे. हे दोघेही व्हिडियो क्रिएटर असून याआधीही त्या दोघांचे बरेच व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आताच्या भारतीय गाण्यावरील डान्सने भारतीय नेटीझन्स त्यांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर ६.५० लाख फॉलोअर्स असून त्यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते. बेस्ट फादर-डॉटर ड्युओ, क्यूट डान्स अशा अनेक प्रतिक्रिया या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर आल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामनृत्य