Join us  

Fact Check : काय सांगता? पठ्ठ्यानं स्वत:च्या दातांचा नेकलेस बनवून गर्लफ्रेंडला केला गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 4:31 PM

Fact check necklace teeth : ही एका एजिप्शियन माणसाची कथा असून यात काही तथ्य नाही हा एक विनोद असल्याचं लेखकाने रॉयटर्सला सांगितले.

एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार होते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या  पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की,  त्या माणसानं आपले दात तोडून प्रेयसीला नेकलेस गिफ्ट केला आहे. ही एका एजिप्शियन माणसाची कथा असून यात काही तथ्य नाही हा एक विनोद असल्याचं एका लेखकाने रॉयटर्सला सांगितले.

(Image Credit- Dpop)

इजिप्तमधील एका तरुणाने आपले सर्व दात काढले आणि आपल्या मैत्रिणीला तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ते गिफ्ट म्हणून दिले...," ऑनलाइन शेअर केलेल्या बहुतेक पोस्टमध्ये लोकांनी हा मजकूर वाचला. या मजकुराच्या बरोबरीने दोन फोटो व्हायरल होत होते. दातांचा नेकलेस आणि काळ्या रंगाच्या शर्टमध्ये एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. 

एकदम ढिंचॅक!! प्री वेडींग शूटसाठी तिचे साडी नेसून वर्कआऊट; एकेक पोज पाहून लोक म्हणाले..

ही पोस्ट ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी अभिनेता मोस्तफा सोलिमान ईएल सईद याने पोस्ट केली होती, ज्यात दात नसलेल्या माणसाचा फोटो दाखवण्यात आला होता. रॉयटर्सने संपर्क साधल्यानंतर सोलिमनने पुष्टी केली की ही कथा खरी नाही आणि एक विनोद म्हणून पोस्ट केली.  हा केवळ ट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सोलिमनने कैरोनं cairo24.com ला सांगितले की,  त्याची ही पोस्ट इजिप्तमध्ये (येथे) 4 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या आधी ही  विनोद म्हणून टाकली होती. 

जॅकी विल्यम्स ही महिला ग्रेव्ह मेटलम ज्वेलर्सची मालकीण आहे. ती मेलेल्या लोकांच्या दातांच्या अंगठ्या, बांगड्या आणि नेकलेस बनवून विकते. काही दागिन्यांमध्ये मानवी अवशेषांचाही समावेश असतो, त्यामध्ये केस किंवा राखेबरोबरच कुठल्याही कुटुंबातील सदस्याचा आययूडीही दागिन्यामध्ये वापरला जातो.

अजबच आहे! मॉडलनं स्वत:शीच लग्न केलं अन् घटस्फोटही घेतला; वाचा भानगड आहे तरी काय?

जॅकी ही आधी एका स्थानिक दफनभूमीमध्ये माळी म्हणून काम करत असे. दरम्यान, तिला एक आजार असल्याचे तिने मान्य केले आहे. कारण मृत व्यक्तींच्या अवशेषांपासून दागिने बनवण्याचे काम करण्याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. मात्र तिच्या ज्वेलरीमुळे लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या शोकामधून सावरण्यामध्ये मदत होऊ शकते, असे ती सांगते. 

जॅकी सांगते की, ती गिऱ्हाईकाच्या विनंतीनुसार तिच्या कुटुंबामध्ये मृत्यू झालेल्या सदस्यांच्या दातांपासून दागिने बनवते. असे केवळ स्पेशल ऑर्डर आल्यावरच केले जाते. लोकांना त्यांच्या जवळील व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख आणि नुकसानामधून सावरण्यास मदत करण्याची माझी इच्छा असते. त्यामुळे मी हे काम करते. हे असे काही जे प्रत्येकाला सुखच देईल, असे जॅकी सांगते.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियारिलेशनशिप