Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे

Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे

आजही जगात आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे, हेच जणू आजींनी दाखवून दिलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:37 IST2026-01-30T16:36:03+5:302026-01-30T16:37:08+5:30

आजही जगात आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे, हेच जणू आजींनी दाखवून दिलं आहे. 

elderly woman selling fruits roadside refused to take free money innocence and honey won people hearts video viral | Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे

Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे

सोशल मीडियावर तसे तर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडीओ असे असतात जे केवळ हसवण्यासाठी किंवा थक्क करण्यासाठी नसून मनाला भिडणारं आणि सत्य मांडण्यासाठी असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फळ विकणाऱ्या एका वृद्ध आजींनी सर्वांचे मन जिंकलं आहे. आजही जगात आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे, हेच जणू या आजींनी दाखवून दिलं आहे. 

इन्स्टाग्रामवर 'vartika_patel_v' नावाच्या पेजवर एक वृद्ध आजी दोन टोपल्या घेऊन फळं विकताना दिसत आहेत. एक व्यक्ती या आजींकडून फळं खरेदी करण्यासाठी तिथे पोहोचली आणि त्यांना काही जास्त पैसे देऊ लागली, परंतु आजींनी ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. खरं तर, ती व्यक्ती कोणतीही फळं न घेता त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करत होती.


आजींनी ठाम शब्दात सांगितलं की, "मी असे पैसे घेऊ शकत नाही, आधी फळं घ्या आणि मगच पैसे द्या." अखेर त्या व्यक्तीने पैसे दिले आणि तिथून फळेंही खरेदी केली. फळविक्रेत्या आजींचे हे बोल ऐकून ती व्यक्ती सुद्धा थोडी थक्क झाली. आजच्या काळात जिथे लोक फुकटचे पैसे घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत, तिथे या वृद्ध महिलेचे हे उत्तर लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. आजी वारंवार हेच सांगत होत्या की, त्यांनी मेहनतीने फळे विकली आहेत आणि कोणतेही सामान न देता पैसे घेणं त्यांना योग्य वाटत नाही. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या आजींचं भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "आजच्या समाजातही अशी माणसं आहेत ज्यांच्यासाठी प्रामाणिकपणा सर्वात वर आहे." तर काहींनी म्हटलं आहे की, "या व्हिडिओने आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे, तो म्हणजे कष्टाच्या कमाईचा सन्मान करणं किती गरजेचं आहे." सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की, परिस्थिती कशीही असो, पण आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा कधीही सोडू नये.

Web Title : स्वाभिमानी फल विक्रेता ने मुफ्त पैसे लेने से इनकार किया, उचित व्यापार पर जोर दिया।

Web Summary : एक बुजुर्ग फल विक्रेता का मुफ्त पैसे लेने से इनकार करने का वीडियो वायरल हो रहा है। उसने दान लेने के बजाय फल बेचने पर जोर दिया, जो उसके स्वाभिमान और ईमानदारी को दर्शाता है। यह कार्य लोगों को मेहनत से कमाए गए धन और सत्यनिष्ठा को महत्व देने के लिए प्रेरित कर रहा है।

Web Title : Self-respecting fruit vendor refuses free money, insists on fair trade.

Web Summary : A video of an elderly fruit vendor refusing free money is going viral. She insisted on selling fruits instead of taking charity, showcasing her self-respect and honesty. Her act is inspiring people to value hard-earned money and integrity.