कर्तव्यावर हजर असताना लोकांची प्राण पणाला लावून सेवा करताना पोलिस कर्मचारी स्वत:चाही विचार करत नाहीत. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पोलिस सामान्य लोकांना मदत करताना दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेला आपल्या खांद्यावर घेऊन घरी आणल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या महिला पोलिसाचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. (Elderly woman had fainted due to heat female policeman carried 5km on her shoulder and reached home)
हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक माहितीही दिली आहे. माहितीत त्यांनी लिहिले आहे - गुजरातमधील वर्षा परमार या महिला कॉन्स्टेबलने कच्छमधील एका ८६ वर्षीय व्यक्तीला तब्येतीच्या समस्येमुळे पाठीवर उचलले आहे. 5 किलोमीटर चालल्यानंतर त्यांनी आजींना आपल्या घरी पोहोचवलं.
जोडी लय भारी! कोरियन वरासोबत साडीमध्ये झळकली भारतीय नवरी; पाहा व्हायरल व्हिडिओ
या फोटोवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या फोटोवर लोक खूप कमेंट करत आहेत. यावर एका युजरने कमेंट करताना लिहिले - खरोखरच हृदयस्पर्शी चित्र. दुसरीकडे, दुसर्या वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले - हृदय पिळवटून टाकणारा फोटो. महिला पोलिसाच्या माणुसकीला सलाम केला जात आहे.