Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूमच्या बादल्यांवर चिकट-काळा थर साचलाय? ४ पदार्थ लावा-२ मिनिटांत निघेल सर्व घाण

बाथरूमच्या बादल्यांवर चिकट-काळा थर साचलाय? ४ पदार्थ लावा-२ मिनिटांत निघेल सर्व घाण

Effective Ways To Clean Hard Water Stains from Plastic Mugs Buckets : बादल्या, अंघोळीसाठी बसण्याचा पाट यावर पाण्याचा थर जमा होऊन काळे किंवा पिवळे डाग पडतात आणि तो भाग चिकट होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:23 IST2026-02-27T12:11:08+5:302026-02-27T12:23:35+5:30

Effective Ways To Clean Hard Water Stains from Plastic Mugs Buckets : बादल्या, अंघोळीसाठी बसण्याचा पाट यावर पाण्याचा थर जमा होऊन काळे किंवा पिवळे डाग पडतात आणि तो भाग चिकट होतो.

Effective Ways To Clean Hard Water Stains from Plastic Mugs And Buckets | बाथरूमच्या बादल्यांवर चिकट-काळा थर साचलाय? ४ पदार्थ लावा-२ मिनिटांत निघेल सर्व घाण

बाथरूमच्या बादल्यांवर चिकट-काळा थर साचलाय? ४ पदार्थ लावा-२ मिनिटांत निघेल सर्व घाण

बाथरूमध्ये सतत वापरल्या जाणाऱ्या बादल्या, मग नेहमीच काळे पडत असतात.बाथरूम, किचन अशा जागा असतात जिथे बॅक्टेरिया सर्वात जास्त येण्याचा धोका असतो (Cleaning Tips). अनेकदा बाथरूमची साफसफाई करत असताना आपण बाथरूमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंची साफ-सफाई करायला विसरतो. मग, बादल्या, अंघोळीसाठी बसण्याचा पाट यावर पाण्याचा थर जमा होऊन काळे किंवा पिवळे डाग पडतात आणि तो भाग चिकट होतो. (How to Hard Water Stains from Plastic Mugs And Buckets)

बरेच लोक खराब झालेल्या बादल्या फेकून देतात किंवा महागड्या क्लिनिंग उत्पादनांचा वापर करतात. बादल्या बरेच दिवस स्वच्छ केल्या नाहीतर डाग तयार होतात. हे डाग काढणं खूपच कठीण काम असतं. पण घरातले काही पदार्थ बादल्यांवरील डाग काढून टाकण्याचं काम सोपं करतात. (Effective Ways To Clean Hard Water Stains from Plastic Mugs And Buckets)

 व्हिनेगर

 गेटसेट क्लिन.इनच्या रिपोर्टनुसार व्हिनेगरचा वापर खाण्यासोबत साफ-सफाईच्या कामांसाठीही केला जातो. यात एसिटीक एसिड असते. ज्यामुळे साबणाचा मळ, कठोर पाण्याचे डाग आणि इतर प्रकारची घाण साफ करण्यास मदत होते. २ कप व्हिनेगरमध्ये  पाणी मिसळून स्पंजच्या मदतीनं रडून ५ मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं साफ करा. हा उपाय केल्यास पाण्याचे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल तसंच इतर डागही कमी होतील. (Ref)

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यातील सोडीयम बायकार्बोनेट हट्टी डाग काढण्यासोबतच दुर्गंध कमी करण्यास मदत करतात. बादली आणि मग स्वच्छ करण्यासाठी अर्धा चमचा बेकींग सोडा, साबण आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट बादली आणि मग वर लावून ५ ते १० मिनिटं तसंच सोडा नंतर बादली रगडून स्वच्छ करा. पिवळेपणा आणि इतर डाग यामुळे सहज निघून जातील.

 मीठ आणि गरम पाणी

घाणेरड्या बादल्या आणि मग गरम पाण्यानं भरून ठेवा. नंतर यात २ ते ३ चमचे मीठ घाला. जवळपास २० मिनिटं तसंच ठेवून द्या. नंतर ब्रशच्या मदतीनं रगडून स्वच्छ करा. यामुळे डाग मऊ होतील आणि  साफ करणं सोपं होईल.

ब्लीच पावडर

ब्लीच पावडर हट्टी डाग काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. ब्लीच पावडर दुर्गंध दूर करून घाण डाग कमी  करण्यास मदत करते. एक कप ब्लीच पावडरमध्ये थोडं पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट बादली आणि मगवर लावून १५ ते २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर ब्रशच्या मदतीनं रगडून स्वच्छ करा.

Web Title : बाथरूम की बाल्टियाँ साफ करें: 4 चीजें मिनटों में गंदगी हटाएँ।

Web Summary : बाथरूम की बाल्टियों पर अक्सर पानी के दाग और गंदगी जम जाती है। सिरका, बेकिंग सोडा, नमक का पानी या ब्लीच पाउडर इन दागों को हटाने में मदद करते हैं। लगाकर, रगड़कर धो लें और बाल्टी चमक उठेगी।

Web Title : Clean bathroom buckets easily: 4 ingredients remove grime in minutes.

Web Summary : Hard water stains and grime plague bathroom buckets. Vinegar, baking soda, salt water, or bleach powder can effectively remove these stains. Apply, scrub, and rinse for a sparkling clean.