Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुम आणि सिंकमधला घाणेरडा वास कमी करणारा एकदम सोपा उपाय, खर्च फक्त २ रुपये

बाथरुम आणि सिंकमधला घाणेरडा वास कमी करणारा एकदम सोपा उपाय, खर्च फक्त २ रुपये

Tips For Bathroom Or Sink Cleaning: बाथरूम किंवा सिंकच्या पाइपमधील ब्लॉकेज लगेच होतील दूर, कसे ते वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:56 IST2025-07-30T13:20:54+5:302025-07-30T14:56:35+5:30

Tips For Bathroom Or Sink Cleaning: बाथरूम किंवा सिंकच्या पाइपमधील ब्लॉकेज लगेच होतील दूर, कसे ते वाचा..

Easy way to clean dirty bathroom drain and sink pipe using baking soda | बाथरुम आणि सिंकमधला घाणेरडा वास कमी करणारा एकदम सोपा उपाय, खर्च फक्त २ रुपये

बाथरुम आणि सिंकमधला घाणेरडा वास कमी करणारा एकदम सोपा उपाय, खर्च फक्त २ रुपये

Tips For Bathroom Cleaning: बाथरूम किंवा सिंकमधून घाणेरडा वास येणं ही घराघरांमधील कॉमन समस्या आहे. जेव्हा घरातील नाल्यांमध्ये कचरा, केस जमा होतात तेव्हा त्या ब्लॉक होतात आणि घाण जमा झाल्यानं वास येऊ लागतो. तसे तर बाथरूम किंवा किचन सिंकमधील हे ब्लॉकेज मोकळे करण्यासाठी वेगवेगळी उत्पादन मिळतात. पण ती महागडी असतात. इतके पैसे खर्च न करताही ही समस्या दूर केली जाऊ शकते. 

लागणारं साहित्य

बेकिंग सोडा १ कप

व्हिनेगर १ कप

गरम पाणी १ ते २ लीटर

लिंबाचा रस

कसा कराल वापर?

सगळ्यात आधी बाथरूम किंवा सिंकच्या पाइपमध्ये १ कप बेकिंग सोडा टाका. ज्यामुळे पाइपमध्ये जमा झालेली घाण सैल होऊ लागेल. 

त्यानंतर पाइपमध्ये हळूहळू एक कप व्हिनेगर टाका. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र झाल्यावर फेस तयार होईल. हाच भेस पाइपमध्ये जमा कचरा, घाण साफ होऊ लागेल. 

या दोन गोष्टी पाइपमध्ये टाकल्यानंतर १५ ते २० मिनिटं काहीच करू नका. जेणेकरून दोन्ही केमिकल्स रिअ‍ॅक्शन आपलं करेल. यादरम्यान पाइपमधून बुडेबुडे किंवा हलका आवाज येऊ शकतो. त्याला घाबरण्याची गरज नाही. 

१५ ते २० मिनिटं वाट बघितल्यानंतर हळूहळू पाइपमध्ये १ ते २ लीटर कडक गरम पाणी टाका. या पाण्यानं सैल झालेला कचरा बाहेर निघेल आणि पाइप आतून पूर्ण साफ होईल.

शेवटी पाइफमध्ये काही थेंब एसेंशिअल ऑइल टाका किंवा लिंबाचा रस टाका. यानं पाइपमधील घाण वास नाहीसा होईल आणि फ्रेश वाटेल.

Web Title: Easy way to clean dirty bathroom drain and sink pipe using baking soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.