Cooker Cleaning Tips : कुकर हे किचनमधील सगळ्यात महत्वाचं भांड म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण कुकरमध्ये जेवण बनवल्यासाठी वेळ कमी लागतो. सकाळच्या घाईत कुकर खूपच फायदेशीर ठरतो. पण भाजी, खिचडी, डाळी या गोष्टींसाठी सतत वापर केल्याने कुकरवर तेल, मसाल्यांचे अनेक काळे-चिकट डाग लागतात. जे वेळीच साफ केले नाही तर अधिक घट्ट होऊन बसतात. ज्यामुळे कुकर चांगला दिसत नाही. तसेच त्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा देखील धोका असतो. इतर भांड्यांच्या तुलनेत कुकर घासायला जरा जास्त वेळ लागतो. तरीही त्यावरील डाग पूर्णपणे जात नाहीत. अशात आज आम्ही आपल्यासाठी कुकर चकाचक करण्याचे काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. जे करून आपला कुकर पुन्हा नव्यासारखा चकाचक चमकेल.
डिटर्जेंट पावडर आणि मीठ
सगळ्यात आधी तर कुकरमध्ये टाका आणि हे पाणी २ ते ३ वेळा उकळा. आता या कडक झालेल्या पाण्यात एक चमचा डिटर्जेंच पावडर आणि एक चमचा मीठ टाका. कुकरवर फार जास्त चिकटपणा असेल तर त्यात अर्ध्या लिंबाचा रसही टाकू शकता. आता हे मिश्रण पुन्हा २ ते ३ वेळा उकळा. या मिश्रणाच्या मदतीने कुकरवर जमा डाग, चिकटपणा निघून जाईल. यानंतर कुकरमधील पाणी थोडं थंड होऊ द्या आणि नंतर घासणीने कुकर चांगला घासा त्यावरील डाग गेलेले दिसतील.
टूथपेस्टही फायदेशीर
कुकरवरील डाळे-पिवळे डाग काढण्यासाठी आणि चिकटपणा दूर करण्यासाठी सहजपणे दूर करण्यासाठी पांढऱ्या रंगांची टूथपेस्ट वापरू शकता. ताराच्या घासणीवर थोडी टूथपेस्ट लावा आणि नंतर कुकरचा कानाकोपरा चांगला घासा. काही मिनिटांमध्ये कुकरवर चिकटून बसलेले काळे-पिवळे डाग आणि तेलाचा चिकटपणाही दूर होऊन कुकर चमकू लागेल.
व्हाइट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
कुकरमध्ये पाणी आणि व्हाइट व्हिनेगरचं मिश्रण उकळा. आता गॅस बंद करून या मिश्रणात थोडा बेकिंग सोडा घाला. जेव्हा हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर कुकरवरील डाग घासा. घासताना आपल्या लक्षात येईल की, जास्त मेहनत न घेताही कुकरवरील डाग निघून कुकर चकाचक दिसू लागेल.
