Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > काही मिनिटांमध्ये तव्यावरील काळे डाग आणि चिकटपणा होईल दूर, ट्राय करा 'हे' सोपे उपाय...

काही मिनिटांमध्ये तव्यावरील काळे डाग आणि चिकटपणा होईल दूर, ट्राय करा 'हे' सोपे उपाय...

Tips and Tricks to Clean Tawa: दिसायला वाईट वाटण्यासोबतच, हा काळा थर स्वयंपाक करतानाही अडचणी निर्माण करतो. पण काळजी करू नका! काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही तवा अगदी नवीनसारखा चमकवू शकता तेही कोणत्याही केमिकलशिवाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:25 IST2025-11-03T12:24:53+5:302025-11-03T12:25:49+5:30

Tips and Tricks to Clean Tawa: दिसायला वाईट वाटण्यासोबतच, हा काळा थर स्वयंपाक करतानाही अडचणी निर्माण करतो. पण काळजी करू नका! काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही तवा अगदी नवीनसारखा चमकवू शकता तेही कोणत्याही केमिकलशिवाय.

Easy tricks to clean tawa in kitchen | काही मिनिटांमध्ये तव्यावरील काळे डाग आणि चिकटपणा होईल दूर, ट्राय करा 'हे' सोपे उपाय...

काही मिनिटांमध्ये तव्यावरील काळे डाग आणि चिकटपणा होईल दूर, ट्राय करा 'हे' सोपे उपाय...

Tips and Tricks to Clean Tawa: तवा स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं आहे. सतत वापरामुळे त्यावर तेल, चिकटपणा आणि काळा थरही तयार होतो. दिसायला वाईट वाटण्यासोबतच, हा थर स्वयंपाक करतानाही अडचणी निर्माण करतो. पण काळजी करू नका! काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही तवा अगदी नवीनसारखा चमकवू शकता तेही कोणत्याही केमिकलशिवाय.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

किचनमध्ये सहज मिळणारं सिरका व्हिनेगर आणि बेकिंग सोडा तवा स्वच्छ करण्यात अत्यंत उपयुक्त आहेत. एका वाटीत व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तव्यावर समानपणे लावा आणि 10–15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्क्रबने तवा चांगला घासून घ्या. काही मिनिटांत तव्यावरील काळेपणा आणि चिकट थर पूर्णपणे निघून जाईल.

मीठ आणि लिंबूचा जबरदस्त कॉम्बिनेशन

हा उपाय नैसर्गिक आणि प्रभावी आहे. तवा हलका गरम करून घ्या. त्यावर थोडं मीठ शिंपडा. आता एक लिंबू अर्धा कापून त्या तव्यावर घासायला सुरुवात करा. लिंबातील आम्ल आणि मिठाचे दाणे मिळून तव्यावरील काळेपणा सहज दूर करतात. 5–10 मिनिटे घासल्यावर तवा स्वच्छ पाण्याने धुवा.

मीठ + लिंबू + व्हिनेगर

तवा हलक्या आचेवर ठेवून त्यावर थोडं मीठ टाका. थोडं गरम झाल्यावर अर्धा लिंबू तव्यावर घासा. आता लिंबाच्या रसात थोडं व्हिनेगर मिसळून हे मिश्रण तव्यावर ओता. 2–3 मिनिटे गरम होऊ द्या आणि मग गॅस बंद करा. तवा थंड झाल्यावर साबणाच्या पाण्याने चांगला धुवा. तुमचा तवा आता एकदम नव्यासारखा चमकणार! 

Web Title : मिनटों में जले हुए तवे को साफ करने के आसान तरीके

Web Summary : सिरका और बेकिंग सोडा, या नींबू और नमक से जले हुए तवे को आसानी से साफ करें। ये सरल घरेलू उपाय ग्रीस और गंदगी को हटाते हैं, और कठोर रसायनों के बिना चमक बहाल करते हैं।

Web Title : Easy Ways to Clean a Burnt Tawa in Minutes

Web Summary : Clean burnt tawas easily with vinegar and baking soda, or lemon and salt. These simple home remedies remove grease and grime, restoring shine without harsh chemicals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.