Join us

उन्हाळ्यात लिंबं वाळून वाया जातात, महागडी लिंबं दिर्घकाळ टिकावीत तर करा १ सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2024 13:08 IST

Easy trick to Store Lemons for long in summer : लिंबं खराब झाली तर पैसे वाया जातातच पण लिंबंही वाया जातात.

उन्हाळ्याच्या दिवसांत हवेत तापमान वाढल्याने  भाजी आणि फळं लवकर खराब होतात आणि वाळून जातात. हिवाळ्याच्या दिवसांत अगदी ५ ते १० रुपयांना मिळणाऱ्या भाज्यांच्या किंमती उन्हाळ्यात खूप जास्त वाढतात. व्हिटॅमिन सीचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या लिंबाला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते.उन्हाळ्यात सरबत करण्यासाठी आणि इतरही पदार्थांसाठी आपल्याला लिंबू लागते. मात्र उन्हाळ्यात लिंबं लगेचच वाळून जातात आणि खराब होतात. वाळलेले लिंबू कडवट लागते त्यामुळे ते टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो. भाज्या दिर्घकाळ टिकाव्यात म्हणून आपण फ्रिजमध्ये ठेवतो पण लिंबू इतर भाज्यांप्रमाणे फ्रिजमध्येही ठेवू शकत नाही, कारण फ्रिजमध्ये ते खूप कडक होते (Easy trick to Store Lemons for long in summer).  

सी व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे.  कॅलरी बर्न होण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा उपाय अनेक जण करतात. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते कधी सॅलेडवर, कोशिंबीरीत तर पोहे, उपीट यांवरही आपण आवर्जून लिंबू पिळून घेतो. पण भरपूर पैसे देऊन आणलेली ही  लिंबं खराब झाली तर पैसे वाया जातातच पण लिंबंही वाया जातात. म्हणूनच आज आपण लिंबू जास्त दिवस टिकावे आणि लगेच वाळून जावू नये यासाठी ते साठवण्याची सोपी पद्धत पाहूयात...

(Image : Google)

१. लिंबं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. 

२. एका वाटीत तेल घेऊन ते बोटाने संपूर्ण लिंबाला चोळायचे. 

३. वर्तमानपत्राचे लहान तुकडे करून त्यामध्ये तेल लावलेले प्रत्येक लिंबू गुंडाळून ठेवायचे. 

४. पेपरमध्ये गुंडाळलेली ही लिंबं एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायची. 

५. ही पिशवी बंद करून फ्रिजमध्ये ठेवायची. लागेल तसे एक एक लिंबू काढून गरजेनुसार वापरायचे. 

६. अशाप्रकारे ठेवलेली लिंबं साधारण २ महिने फ्रीजमध्ये चांगली टिकतात. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबं महाग असताना ती वाया जाऊ नयेत यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करा

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.