Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजरमधील बर्फाचा डोंगर काही मिनिटात वितळेल, फक्त फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:08 IST

How To Defrost Freezer Quickly: फ्रिजरमधील बर्फ काढण्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या ट्रिक सांगणार आहोत. ज्या वापरून काही मिनिटात आपण फ्रिजरमधील बर्फ गायब करू शकता.  

How To Defrost Freezer Quickly: फ्रिज प्रत्येकाच्या घरात असणारी फार गरजेची अशी वस्तू असते. यात भाज्या फ्रेश राहतात, वेगवेगळे पदार्थ फ्रेश राहतात आणि थंड पाणी सुद्धा मिळतं. वेगवेगळ्या कामांसाठी फ्रिजचा वापर केला जातो. यात खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवत असल्याने त्याची स्वच्छताही महत्वाची ठरते. फ्रिजबाबत एक समस्या नेहमीच लोकांना होते. ती म्हणजे फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होणे. म्हणजे फ्रिजमध्ये जर काही ठेवलं असेल आणि बर्फ जमा झाला असेल तो तोडून ती वस्तू बाहेर काढावी लागते. हे फारच डोकेदुखीचं काम ठरतं.  

फ्रिजरमध्ये बर्फाचा मोठा थर सगळीकडे घट्ट बसतो. याने फ्रिजचं लाइफ तर कमी होतंच, सोबतच याने आपला खर्च देखील वाढतो. बर्फ काढण्यासाठी अनेकदा घरातील लोक चाकू, कात्री किंवा एखाद्या टोकदार वस्तूची मदत घेतात. याने इजा होण्याचा धोकाही असतो. इतकंच नाही तर फ्रिजमधील गॅस पाइप फुटण्याचा देखील धोका असतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, फ्रीजरमधील हा बर्फ काढण्यासाठी इतकी मेहनत करण्याची देखील गरज नसते. हा बर्फ काढण्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या ट्रिक सांगणार आहोत. ज्या वापरून काही मिनिटात आपण फ्रिजरमधील बर्फ गायब करू शकता.  

सगळ्यात आधी काय कराल? 

जर फ्रिजरमध्ये जमा झालेला बर्फ वितळवायचा असेल तर काहीही करण्याआधी फ्रिजचा प्लग काढून घ्या. फ्रिजमध्ये गोष्टी थोडावेळ बाहेर काढून ठेवा. सोबतच खाली आजूबाजूला टॉवेल किंवा कोणतेही कापड ठेवा. जेणेकरून पाणी सगळीकडे पसरणार नाही.  

फ्रिजरमधील बर्फ काढण्याचा सोपा उपाय  

गरम पाणी

एका भांड्यात उकडतं पाणी घ्या आणि ते भांडं फ्रिजरमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरचा झाकण बंद करा. १५ ते २० मिनिटात वाफेच्या मदतीने फ्रिजरमधील बर्फ पूर्णपणे वितळून जाईल.  

फॅनची ट्रिक  

बर्फ जर फार जास्त जमा झाला असेल तर फॅनची ट्रिकही वापरू शकता. फ्रिजर उघडून त्यासमोर टेबल फॅन लावा. हवा आत जाईल तर बर्फ वितळण्याची प्रोसेस सुरू होईल.  

बर्फ काढताना काय काळजी घ्यावी? 

फ्रिजरमधील बर्फ काढताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. बर्फ काढण्यासाठी नेहमी प्लास्टिक टूल्सचाच वापर करा. टोकदार वस्तूंचा वापर करणं टाळा. चाकू, कात्री किंवा स्क्रू ड्रायव्हरने फ्रिज खराब होऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Melt freezer ice fast: Simple tips to defrost in minutes.

Web Summary : Quickly defrost your freezer using hot water or a fan. Avoid sharp tools to prevent damage. Unplug the fridge first and place towels to catch water. Simple tricks can save time and prevent freezer damage.
टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्स