Steel Kettle Cleaning Tips : किचनमध्ये साधारणपणे स्टीलची भरपूर भांडी वापरली जातात. या भांड्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. स्टीलची किटली जवळपास सगळ्याच घरांमध्ये असते. प्रत्येक घरात तिचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. काही घरांमध्ये ती दूध आणण्यासाठी वापरली जाते, तर काही घरांमध्ये तेल ठेवण्यासाठी. अशा वेळी दररोज वापरल्या जाणाऱ्या किटलीची साफसफाईही रोज केली जाते. परंतु तिचं झाकण स्वच्छ करण्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे झाकणावर घाणेची जाड थर जमा होतो. नंतर ती साफ करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण इथे आम्ही काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही ते सहजपणे स्वच्छ करू शकता.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा एक उत्तम क्लींजर आहे. बेकिंग सोड्यानं भांड्यांवरील चिकट, चिव्वट डाग काढण्यात मदत मिळते. यासाठी २–३ चमचे बेकिंग सोडा थोड्याशा पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट झाकणावर, कोपऱ्यांमध्ये आणि जिथे जास्त घाण आहे तिथे लावा. १०–१५ मिनिटे असेच राहू द्या. नंतर क्लीनिंग स्पंज किंवा जुना टूथब्रश वापरून हलकेच घासा. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या.
व्हाइट व्हिनेगर
व्हिनेगरचे आम्लीय गुण पाण्याचे डाग आणि चिकटपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात. एका बाऊलमध्ये व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. शक्य असल्यास झाकण १५–३० मिनिटे या मिश्रणात बुडवून ठेवा. नंतर स्पंज किंवा ब्रशने घासून स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने धुवा आणि लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्या, म्हणजे पाण्याचे डाग पडणार नाहीत.
लिंबू आणि मीठ
हे मिश्रण डाग व दुर्गंधी दोन्ही दूर करतं आणि स्टीलला चमकही येते. यासाठी लिंबाच्या रसात थोडसं मीठ मिसळा. हे मिश्रण थेट झाकणावर लावा किंवा लिंबाच्या सालाचा वापर करून झाकणावरील डागांवर घासा. काही मिनिटांनंतर पाण्याने धुवा आणि कोरडे करा.
Web Summary : Easily clean greasy steel kettle lids using baking soda, white vinegar, or lemon and salt. Apply, scrub, and rinse for a sparkling clean. Regular cleaning prevents grime buildup.
Web Summary : बेकिंग सोडा, व्हाइट विनेगर या नींबू और नमक का उपयोग करके स्टील की केतली के ढक्कन को आसानी से साफ करें। लगाकर, स्क्रब करें और चमकदार सफाई के लिए धो लें। नियमित सफाई से गंदगी का निर्माण रोका जा सकता है।