बाथरूमच्या टाईल्स पिवळट होतात आणि त्यावर डाग, बुरशी दिसायला सुरूवात होते. या डागांची वेळीच सफाई केली नाही तर टाईल्समधून वास येऊ लागतो आणि बाथरूम जुनाट दिसतं. काही घरगुती उपाय करून तुम्ही नव्यासारख्या टाईल्स चमकवू शकता (Easy Solution To Clean Bathroom Tiles in Just 10 Rupees). कमी मेहनतीत टाईल्स स्वच्छ करण्याचे काही खास उपाय पाहूया. (How To Clean Bathroom Tiles Easily)
लिंबू
लिंबातील नैसर्गिक एसिड डाग आणि पिवळेपणा दूर करते. यासाठी टाईल्सवर लिंबाचा रस लावा, त्यावर बेकिंग सोडा शिंपडा नंतर 10 मिनिटांनी ब्रश करून रगडून स्वच्छ करून घ्या. या उपायानं फंगस आणि दुर्गंध दोन्ही कमी होईल.
व्हिनेगर
व्हिनेगर बाथरूम स्वच्छ करण्याचा एक असरदार उपाय आहे. व्हिनेगर पाण्यात घेऊन स्प्रे बॉटलनं टाईल्सवर शिंपडा. जवळपास १५ मिनिटानंतर ब्रशनं रगडून स्वच्छ करा नंतर पाण्यानं धुवा. हा उपाय केल्यास पाण्याचे डाग आणि बुरशी लगेच स्वच्छ होण्यास मदत होईल.
इनो
जर लवकर साफसफाई करायची असेल तर इनोचे पाणी सगळ्यात उत्तम उपाय आहे. इनोचं पाणी उघडून टाईल्सवर फवारा. त्यानंतर थोड्यावेळानं ब्रशनं स्वच्छ करून घ्या आणि पाण्यानं टाईल्स धुवा. यातील सायट्रिक एसिड सोडीयम बायकार्बोनेटचा फेस कमी करेल. घाण कमी होईल आणि साफ-सफाई करणं सोपं होईल.
दिवाळीसाठी ब्लाऊज शिवून घेताय? १० नवीन स्लिव्हज पॅटर्न्स पाहा, स्टालिश-सुंदर लूक येईल
साफ सफाईसाठी तुम्ही कोमट पाण्यात डिटर्जेंट मिसळून एका कापडानं टाईल्सवर लावा. हलक्या हातानं रगडून हे डाग स्वच्छ करा. या पद्धतीनं स्वच्छ केल्यास बाथरूम रोज व्यवस्थित दिसेल आणि घाण जमा होणार नाही. आठवड्यातून कमीत कमी दोनवेळा बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करा.
एका सेकंदात निघेल कानातला पिवळा मळ; डॉक्टर सांगतात ३ उपाय, झटक्यात कान साफ
साफसफाई केल्यानंतर टाईल्स कोरड्या कापडानं पुसायला विसरू नका. मॉईश्चर येऊ नये यासाठी खिडक्या आणि एग्जॉस्ट फॅन सुरू ठेवा. एसिड किंवा ब्लिच यांसारख्या रासायनिक क्लिनर्सना वारंवार उपयोग करू नका.
या घरगुती उपायांनी टाईल्स चांगले राहतील. बॅक्टेरिया आणि फंगस कमी होईल तसंच बाथरूम चमकण्यासही मदत होईल. हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. ज्यामुळे बाथरूम नेहमी स्वच्छ आणि ताजं, चमकदार दिसेल.