बाथरुमसह संपूर्ण घर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात. परंतु अनेक वेळा घाणेरड्या झालेल्या बादल्या बाथरुमचा लूक खराब करतात. लोक महागडे क्लिनिंग प्रोडक्ट वापरून पाहतात, पण डाग तसेच राहतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर चिंता करण्याची गरज नाही. घरात ठेवलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने जुन्या किंवा खराब झालेल्या बादल्या काही मिनिटांत चमकू लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.
प्लास्टिकची बादली स्वच्छ करण्याची पद्धत
बेकिंग सोडा हा स्वयंपाकघरातील एक घटक आहे जो घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. फक्त थोडा बेकिंग सोडा, भांडी घासण्याचा साबण आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टूथब्रशने बादलीवर लावा, ५-१० मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर घासून धुवून टाका. घाण आणि पिवळेपणा लगेच नाहीसा होईल, बादली नव्यासारखी चमकू लागेल.
डाग कसे काढायचे?
बादल्या कधी कधी जास्त पिवळ्या होतात. अशा परिस्थितीत व्हिनेगर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. पाण्यात दोन कप व्हिनेगर मिसळा. बादली स्पंजने घासून घ्या. पिवळा रंग थोड्याच वेळात निघून जाईल.
बादली खूपच खराब झाली असेल तर...
जर डाग खूप जास्त असतील तर हायड्रोजन पेरोक्साइड वापरा. पाण्यात थोड्या प्रमाणात मिसळा आणि बादली ब्रशने स्वच्छ करा. यामुळे पिवळेपणा तर दूर होईलच, पण बॅक्टेरिया देखील नष्ट होतील. डाग जातील. बादली स्वच्छ पाण्याने धुवा.