Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघर-बाथरुममधल्या टाइल्समधल्या काळ्याकुट्ट रेषा, पिवळे डाग घालवणारे ४ उपाय-स्वस्तात मस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:54 IST

Tiles Cleaning Tips : फक्त पाणी मारून आणि कापडाने पुसून टाइल्सच्या लाइन्समधील घट्ट डाग काही जात नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला टाइ्ल्सवरील चिकट डाग साफ करण्यासाठी काही सोपे घरगुती सांगणार आहोत.

Tiles Cleaning Tips : घराची सफाई करताना अनेकदा आपण लादी आणि भिंतीवरील टाइल्स स्वच्छ करतो. पण टाइल्सच्या लाइन्स म्हणजेच ग्राउटवर फारसं लक्ष देत नाही. वरवर टाइल्स साफ करण्यावर जास्त भर असतो. किचनमधील टाइल्स असो की खोल्यांमधील काही दिवसांतच टाइल्सच्या लाइन्समध्ये धूळ, माती, तेल आणि साबणांचे चिव्वट डाग चिकटून बसतात. तेलाच्या डागांवर रोज धुळीचा थर बसत जातो आणि काळे डाग आणखी घट्ट बसतात. ज्यामुळे टाइल्सची चमक कमी होते आणि पूर्ण टाइल्स घाण दिसू लागतात. घरी पाहुणे आले तर ते दिसायला बरं वाटत नाही. त्यांच्यासमोर आपली नाचक्की होऊ शकते. फक्त पाणी मारून आणि कापडाने पुसून टाइल्सच्या लाइन्समधील घट्ट डाग काही जात नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला टाइ्ल्सवरील चिकट डाग साफ करण्यासाठी काही सोपे घरगुती सांगणार आहोत. हे उपाय करून टाइल्स पुन्हा नवीन असल्यासारख्या चमकतील.

टाइल्स चमकवण्यासाठी काय कराल?

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर 

घरातील टाइल्सवरील चिव्वट डाग काढण्यासाठी टाइल्सच्या लाइनवर थोडा बेकिंग सोडा शिंपडा आणि वरून थोडं व्हिनेगर टाका. काही सेकंदातच टाइल्सवर फेस तयार होईल. तो ५ ते १० मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर जुन्या ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने टाइल्स आणि लाइन्स घासा. त्यानंतर साध्या पाण्याने टाइल्स धुवा. हा उपाय केल्यावर आपल्याला लगेच टाइल्स आणि लाइन्समधील डाग गायब झालेले दिसतील.

लिंबू आणि मीठ 

लिंबू आणि मिठाचं मिश्रण सुद्धा टाइल्सवरील घट्ट बसलेले चिकट डाग काढण्यासाठी फायदेशीर ठरतं. लिंबाचा रस काढून त्यात थोडं मीठ घाला आणि ही पेस्ट टाइल्सच्या लाइन्समध्ये लावून ब्रशने घासा. लिंबाच्या रसातील नॅचरल अॅसिडने डाग दूर होतील. तर मिठाने धूळ - माती, तेलाचे डाग सैल होतील. या उपायानेही टाइल्स आधीसारखी चमकू लागेल. 

टूथपेस्टही फायदेशीर  

जर टाइल्सच्या लाइन्समधील धूळ-माती, तेलाचे डाग जास्तच घट्ट बसले असतील तर टूथपेस्टचा वापर करू शकता. जुन्या ब्रशवर थोडी टूथपेस्ट लावून लाइन्सवर घासा आणि काही मिनिटांनंतर टाइल्स पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय टाइल्सवरील छोटे- मोठे सगळेच डाग साफ करण्यास मदत करतो.

ब्लीच आणि पाणी 

जर टाइल्सवर जास्तच डाग पडले असतील तर आपण ब्लीच आणि पाण्याचं मिश्रण सुद्धा वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी पाण्यात थोडं ब्लीड घालून ब्रशच्या मदतीने टाइल्सच्या लाइन्सवर लावा आणि नंतर ५ मिनिटांनी टाइल्स पाण्याने धुवा. ब्लीचचा वापर करत असताना हातात ग्लव्स घालायला विसरू नका. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean Tile Lines Instantly: Simple, Cheap Home Remedies That Work!

Web Summary : Remove stubborn grime from tile lines using baking soda, vinegar, lemon, salt, or even toothpaste. Bleach solution also works wonders. Restore your tiles' shine effortlessly!
टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स