Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी कढईचे काळे - चिकट डाग, तेलाचा थर झटक्यात गायब करणारा उपाय; पुन्हा नव्यासारखी चमकेल कढई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:29 IST

How to clean kadhai : कढईवरील काळ्या - चिकट डागांना वैतागले असेल तर चिंता सोडा. आम्ही आपल्यासाठी यावर एक उपाय घेऊन आलोय.

How to clean kadhai : लोखंडी कढईचा वापर स्वयपाक घरात भरपूर गोष्टींसाठी केला जातो. तळण्या-भाजण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत लोखंडी कढई वापरली जाते. पण सततच्या वापरामुळे लोखंडी कढईवर चिकट काळे डाग लागतात. कढईवरील हा चिकट थर चांगलाच मजबूत असतो. त्यामुळे कढई किती वेळाही घासली तरी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. काळे किंवा चिकट डाग तसेच राहतात. जर आपल्यासोबतही असंच होत असेल तर आपल्यासाठी आम्ही एक उपाय घेऊन आलो आहोत. पुढच्या वेळी जेव्हाही कढई घासाल तेव्हा हा उपाय नक्की ट्राय करा.

काय आहे उपाय?

लोखंडी कढईचे चिकट काळे डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि मीठ खूप फायदेशीर ठरतं. यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाका. नंतर कढई गॅसवर ठेवा आणि गॅस सुरू करा. पाणी चांगलं गरम होऊ द्या. त्यानंतर गरम झालेल्या पाण्यात ३ ते ४ लिंबाचा रस घाला, २ मोठे चमचे कपडे धुण्याची पावडर आणि एक चमचा मीठ घाला. सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि गॅस मध्यम आसेवर ठेवा. पाण्याला चांगली उकडी येऊ द्या.

जेव्हा पाणी चांगलं गरम होईल तेव्हा गॅस बंद करा. कढईतील पाणी थोडं थंड होण्याची वाट बघा. ५ मिनिटे वाट बघून कढईतील सगळं पाणी फेका. आता कढई घासणीने चांगली घासा. आपल्याला दिसेल की, कढईवरील चिकट थर साफ होतोय आणि कढई चमकदार होतेय. 

कढई साफ करण्यासाठी, चिकट काळे डाग काढण्यासाठी हा उपाय परफेक्ट ठरू शकतो. जर कढईवर पुन्हा चिकट थर जमा होऊ द्यायचा नसेल तर हा उपाय नियमितपणे करू शकता. काम संपल्यानंतर कढई लगेच साफ केली पाहिजे. जास्त वेळ तशीच ठेवाल तर कढईवर तेल - मसाल्यांचा थर जमा होतो. तो नंतर घट्ट बसतो. कढई धुतल्यानंतर ती सुकवायला विसरू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean your iron kadhai easily with this simple kitchen trick.

Web Summary : Remove stubborn black stains from your iron kadhai using lemon, salt, and washing powder. Boil the mixture, then scrub. Regular cleaning prevents buildup.
टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स