Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कुत्र्याची लाळ घातक, इन्फेक्शन झाल्याने महिलेला गमवावे लागले हात-पाय; काय आहे 'हा' आजार

कुत्र्याची लाळ घातक, इन्फेक्शन झाल्याने महिलेला गमवावे लागले हात-पाय; काय आहे 'हा' आजार

Sepsis From Dog Lick: सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे, ज्यात शरीराची इम्यून सिस्टीम एखाद्या इन्फेक्शनच्या विरोधात फार जास्त प्रतिक्रिया करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:25 IST2026-02-23T15:21:24+5:302026-02-23T15:25:49+5:30

Sepsis From Dog Lick: सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे, ज्यात शरीराची इम्यून सिस्टीम एखाद्या इन्फेक्शनच्या विरोधात फार जास्त प्रतिक्रिया करते.

Dog Lick Led to Sepsis, Woman Loses Four Limbs After Dog’s Lick | कुत्र्याची लाळ घातक, इन्फेक्शन झाल्याने महिलेला गमवावे लागले हात-पाय; काय आहे 'हा' आजार

कुत्र्याची लाळ घातक, इन्फेक्शन झाल्याने महिलेला गमवावे लागले हात-पाय; काय आहे 'हा' आजार

Sepsis From Dog Lick: जुलै २०२५ च्या एके दिवशी यूकेमधील ५२ वर्षीय मनजीत संघा या नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आल्या, त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. पण दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत इतकी बिघडली की, त्या बेशुद्ध पडल्या. त्यांचे हात - पाय थंड पडले होते, ओठ निळे झाले होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. टेस्ट केल्यावर डॉक्टरांना असं आढळून आलं की, महिलेला सेप्सिस झाला आहे. ही एक अशी भयावह स्थिती आहे, ज्यात बॉडीचा इन्फेक्शन रिस्पॉन्सही शरीराला नुकसान पोहोचवू लागतो. त्यांची स्थिती इतकी गंभीर होती की, डॉक्टरांना त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापावे लागले, इतकंच नाही तर त्यांचे दोन्ही हातही कापावे लागले. उपचारादरम्यान त्याना सहावेळा कार्डियाक अरेस्ट आला आणि अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला.

नेमकं काय झालं होतं?

डॉक्टरांचं मत आहे की, महिलेला शरीरावर एक छोटा कट किंवा खरचटलेलं होतं. ती जखम त्यांच्या पाळीव कुत्र्‍याने चाटली, तेव्हाच त्यांना इन्फेक्शनची सुरूवात झाली. कुत्र्‍याच्या लाळेत आढळणारा बॅक्टेरिया कॅपनोसायटोफेगा कॅनिमोरसस सामान्य कुत्र्‍यांसाठी नुकसानकारक नसतो. पण मनुष्यांमध्ये याने गंभीर इन्फेक्शन आणि सेप्सिसचं कारण बनतं. 

काय आहे सेप्सिस?

सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे, ज्यात शरीराची इम्यून सिस्टीम एखाद्या इन्फेक्शनच्या विरोधात फार जास्त प्रतिक्रिया करते. ही प्रतिक्रिया शरीरात सूज पसरते आणि हेल्दी टिश्यू व अवयवांना नुकसान पोहोचवते. गंभीर केसेसमध्ये ही स्थिती सेप्टिक शॉकमध्ये बदलू शकते, ज्यात ब्लड प्रेशर अचानक कमी होतं. यामुळे अवयवांना पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही आणि मल्टी - ऑर्गन फेल्युअरचा धोका वाढतो. 

सेप्सिसची कारणं 

सेप्सिस कोणत्याही इन्फेक्शनने सुरू होऊ शकतं. ज्यात काही खालील कारणांचा समावेश आहे. फुप्फुसांचं इन्फेक्शन, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, पोट किंवा आतडीचं इन्फेक्शन, त्वचेचं इन्फेक्शन, मेंदू किंवा मणक्याचं इन्फेक्शन यांचा त्यात समावेश आहे. जास्तीत जास्त केसेसमध्ये बॅक्टेरिअल इन्फेक्शन याचं कारण असतं. 

सेप्सिसची लक्षणं 

जास्त ताप किंवा शरीराचं तापमान कमी होणं, हृदयाचे ठोके वाढणं, श्वास घेण्यास अडथळा, लघवी कमी येणं, फार जास्त थकवा, त्वचेवर लाल किंवा वेगळ्या रंगाचे डाग, लो ब्लड प्रेशर, थंडी वाजणं, वेदना, अस्वस्थता ही सेप्सिसची कॉमन लक्षणं असू शकतात.

काय काळजी घ्याल? 

जर त्वचेवर कट असेल, खरचटलं असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर ती पाळिव प्राण्यांना चाटू देऊ नका. कोणतीही छोटी जखम लगेच स्वच्छ करा आणि कव्हर करा. ताप, थंडी किंवा अचानक चक्कर येत असेल तर दुर्लक्ष करू नका. पाळीव प्राण्यांचे लाड करा, पण सोबतच स्वच्छतेची देखील काळजी घ्या.

Web Title : कुत्ते की लार बनी जानलेवा: सेप्सिस से महिला ने खोए हाथ-पैर

Web Summary : यूके की एक महिला ने कुत्ते के चाटने से सेप्सिस के कारण हाथ-पैर खो दिए। कुत्ते की लार में मौजूद बैक्टीरिया ने गंभीर संक्रमण किया। सेप्सिस, एक जानलेवा स्थिति है, जिससे कई अंगों ने काम करना बंद कर दिया और अंग काटने पड़े। घावों को तुरंत साफ करें और पालतू जानवरों को चाटने से बचें।

Web Title : Dog Lick Turns Deadly: Woman Loses Limbs to Sepsis

Web Summary : A UK woman lost limbs to sepsis after her dog licked a wound. The bacteria in dog saliva caused a severe infection. Sepsis, a life-threatening condition, led to multiple organ failure and amputations. Clean wounds promptly and avoid letting pets lick them.