Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > पांढरी फरशी आता रंग उडाल्यासारखी दिसते? लादी पुसताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स , घर कायमच चमकेल

पांढरी फरशी आता रंग उडाल्यासारखी दिसते? लादी पुसताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स , घर कायमच चमकेल

Does the white floor look faded now? Remember these simple tips while mopping the floor, your house will always shine : फरशी साफ करताना लक्षात ठेवा या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 12:40 IST2025-10-09T12:38:23+5:302025-10-09T12:40:03+5:30

Does the white floor look faded now? Remember these simple tips while mopping the floor, your house will always shine : फरशी साफ करताना लक्षात ठेवा या टिप्स.

Does the white floor look faded now? Remember these simple tips while mopping the floor, your house will always shine | पांढरी फरशी आता रंग उडाल्यासारखी दिसते? लादी पुसताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स , घर कायमच चमकेल

पांढरी फरशी आता रंग उडाल्यासारखी दिसते? लादी पुसताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स , घर कायमच चमकेल

पांढरी फरशी किंवा लादी घराच्या सौंदर्यात भर घालते. पांढरी लादी फार रिच लुक देते. आजकाल सगळीकडेच ऑफव्हाइट तसेच पांढऱ्या रंगाच्या लाद्या असतात. त्यात अनेक प्रकारही असतात. काचेसारख्या स्वच्छ लाद्याही बसवल्या जातात. मात्र त्यांची काळजी घेणे थोडे अवघड असते. (Does the white floor look faded now? Remember these simple tips while mopping the floor, your house will always shine)त्यावर  डाग, माती आणि घरभर पडणारे केस पटकन दिसून येतात. या लाद्या लवकर मळतात, पण थोडी नियमित काळजी आणि योग्य पद्धतने सफाई केल्यास लादी नेहमी नव्यासारखी दिसू शकते.

सर्वप्रथम, रोज झाडलोट आणि ओलसर फडक्याने पुसणे अत्यावश्यक आहे. पांढऱ्या फरशीवर धूळ, माती आणि डाग पटकन दिसतात. त्यामुळे रोज हलक्याशा गरम पाण्यात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळून पुसल्यास चमक टिकते आणि जंतूंचा नाशही होतो. बाजारात मिळणाऱ्या जड केमिकल्सचा वापर टाळावा, कारण ते फरशीचा पांढरा रंग मंदावतात आणि पृष्ठभागावर स्क्रॅच पडतात. त्यामुळे कोणत्याही केमिकलचा वापर करणे टाळा. 


जर फरशीवर तेलाचे किंवा पाण्याचे डाग पडले असतील, तर लगेच कोरड्या कपड्याने पुसून घ्यावे. जुने डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवून ती डागावर लावून काही मिनिटांनी घासल्यास फरशी पुन्हा स्वच्छ दिसते. विशेषत: स्वयंपाकघर आणि बाथरुममध्ये पांढरी लादी असल्यास दर आठवड्याला डीप क्लिनिंग करणे गरजेचे आहे.

लादीवर चालताना माती लागलेले चप्पल वापरु नये. घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय पुसण्यासाठी दरवाज्याजवळ पायपुसणी ठेवावी. तसेच, फरशीवर ठेवलेल्या फर्निचरच्या पायाखाली फेल्ट पॅड लावल्यास ओरखडे पडत नाहीत. सूर्यप्रकाश थेट पडत असल्यास पडदे वापरुन रंग उडणे टाळता येते. लाद्यांच्या मधील रेषा काळ्या दिसायला लागतात. कारण माती त्यात साठून राहते. त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे ब्रशचा वापर करा. जुने खराब झालेले ब्रश घ्यायचे. त्याला साबण लावायचा. तसेच पाणी लावायचे आणि रेषांवर घासायचे. असे केल्याने त्यात अडकलेली माती आणि घाण लवकर निघून जाते. हे साधे-सोपे उपाय करत राहा. लादी वर्षानुवर्षे नव्यासारखीच दिसेल.  
 

Web Title : सफेद फर्श को चमकदार रखें: घर को चमकाने के सरल उपाय।

Web Summary : सफेद फर्श को नियमित रूप से झाड़ू और नींबू के रस या सिरके से पोंछकर बनाए रखें। तुरंत दाग साफ करें, दागों के लिए बेकिंग सोडा पेस्ट का उपयोग करें, और हर हफ्ते अच्छी तरह सफाई करें, खासकर रसोई और बाथरूम में। नुकसान से बचने के लिए पायदान, फर्नीचर पैड और पर्दे का उपयोग करें।

Web Title : Keep white floors shining: Simple cleaning tips for a sparkling home.

Web Summary : Maintain white floors by regularly sweeping and mopping with diluted lemon juice or vinegar. Promptly clean spills, use baking soda paste for stains, and deep clean weekly, especially in kitchens and bathrooms. Use doormats, furniture pads, and curtains to prevent damage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.