Urinating While Shower : वाढलेलं उन्ह, घामामुळे चिकट झालेलं अंग यामुळे वैतागून जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात शॉवरखाली थंडगार पाणी अंगावर घेतात. तुम्ही सुद्धा अनेकदा या दिवसांमध्ये शॉवर घेत असाल आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की, पाणी आणि शरीराचं तापमान वेगवेगळं असल्यानं आंघोळ करताना अचानक लघवी येते. बरेच लोक टॉयलेटचा वापर करतात, तर बरेच लोक शॉवरखाली आंघोळ करतानाच उभ्यानं लघवी (Urinating While Shower) करतात. ही बाब तुम्हाला सामान्य वाटू शकते. मात्र, एका डॉक्टरांनी असं केल्यावर महिलांना होणाऱ्या एका गंभीर नुकसानाबाबत सांगितलं आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन यूरोगायनेकोलॉजिस्ट डॉ. टेरिसा इरविन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, शॉवर घेत असताना लघवी करणं महिलांसाठी कसं नुकसानकारक ठरू शकतं. त्या म्हणाल्या की, शॉवरमध्ये लघवी करताना महिलांचा मेंदू वाहत्या पाण्यासोबत लघवी करण्याचा संबंध जोडतो. अशात जेव्हा त्या हात धुतात, बकेटमध्ये पाणी भरतात, आंघोळ करतात तेव्हा त्यांना लघवी आल्याची जाणीव होते.
शॉवरमध्ये महिलांनी उभ्यानं लघवी का करू नये?
डॉक्टरांनी सांगितलं की, पुरूष जेव्हा लघवी करतात तेव्हा त्यांच्या ब्लॅडरला प्रोस्टेटचा सपोर्ट असतो. त्यामुळे ते उभे राहून लघवी करू शकतात. मात्र, महिलांनी शॉवर घेत असताना कधीही उभं राहून लघवी करू नये. कारण यानं पेल्विक फ्लोर म्हणजेच ओटी पोटाच्या मसल्सवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामं होत नाही. या शिल्लक राहिलेल्या लघवीला यूरिनरी रिटेंशन असं म्हणतात. ज्यामुळे महिलांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यात यूरिन इन्फेक्शन आणि किडनी फेलिअरचा समावेश आहे.
इतरही एका डॉक्टरांनी दर्शवलं सहमत
व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
भारतात टिकटॉक बॅन आहे, त्यामुळे डॉक्टर इरविन यांचा व्हिडीओ इथे आपण शेअर करू शकत नाही. असं असलं तरी मेरेडिथ ब्रिजिंस्की नावाच्या एका दुसऱ्या डॉक्टरांनी 2021 मध्ये इन्स्टा आणि फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. ज्यात त्यांनी सांगितलं की, शॉवर घेत असताना महिलांनी लघवी करणं घातक ठरू शकतं. कारण यामुळे पेल्विक फ्लोरवर दबाव पडू शकतो. ज्यामुळे लघवी पूर्णपणे बाहेर निघत नाही. नंतर जेव्हा महिला इतर ठिकाणी कुठेही असतील तेव्हा त्यांना खोकला आला किंवा शिंक आली तर पेल्विक फ्लोर रिलीज होतो आणि लघवी बाहेर निघून येते.