Join us

गार पाणी हवं म्हणून माठ भरता, पण माठाची ‘अशी’ घ्या काळजी, नाहीतर हमखास पडाल आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 15:46 IST

do you take care of the water clay pot? if not then you will definitely fall ill : मातीचे माठ पाण्याने भरण्याआधी साफ करता ना? करायलाच हवेत नाहीतर आजारी पडाल.

प्यायचे पाणी साठवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू असतात. स्टीलच्या टाक्या असतात. प्लास्टिकच्या वस्तू असतात. मडकी असतात, मातीचे माठ असतात. नैसर्गिकरित्या पाणी गार राहवे यासाठी मातीच्या माठांचा उपयोग आपण करतो. ( do you take care of the water clay pot?  if not then you will definitely fall ill.)मात्र हे माठ आणले आणि तसेच वापरले असे करता येत नाही. त्या माठांची काळजी घ्यावी लागते. मठाचा मडक्याचा मेंटेनन्स करावा लागतो. त्यासाठी काही उपाय करावे लागतात. माठ हे पाणी गार ठेवण्याचे नैसर्गिक साधन आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतानाही नैसर्गिक पद्धतींचाच वापर करायला हवा. साबणाने माठ घासणे चांगले नाही. त्यामुळे माठाची झीज तर होतेच शिवाय साबणाचे कण माठात अडकतात जे पाण्यात मिसळतात. आरोग्यासाठी ते चांगले नाही. 

 १. मडकं आणल्यानंतर आधी ते स्वच्छ पाण्याने धुवायचे. काथ्याने किंवा घासणीने घासायचे आणि पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवायचे. अख्खा दिवस पाण्यात बुडवून ठेवायचे. ( do you take care of the water clay pot?  if not then you will definitely fall ill.)दुसऱ्या दिवशी पुन्हा घासायचे आणि मग पाण्यात ठेवायचे. असे पूर्ण माती निघायची थांबेपर्यंत करा. दोन धुण्यात काम होते. 

२.  मडकं दर दोन दिवशी धुवायचे. त्यात पाणी साठवून ठेवायचे नाही. जास्त वेळ राहिलेले पाणी बदलायचे. कारण मडक्यातील पाण्यात जंतू तयार होतात. बॅड बॅक्टेरिया तयार होतो. त्यामुळे पाणी अगदी घाण होते. असे पाणी प्यायलात तर आरोग्याची अगदी वाटच लागेल. 

३. मडक्याला साबण, डिटर्जंट लावल्यास मडके त्यातील रसायने शोषून घेते. त्यामुळे पाणी खराब होते. पिण्यायोग्य राहत नाही. मडके धुण्यासाठी त्यात भरपूर पाणी भरायचे आणि लिंबाचा रस पिळायचा. हाताने चांगले रगडून मडके धुवायचे. गरम पाणी मडक्यात ओतायचे. असे केल्याने त्यातील विषाणू निघून जातात. सूर्याच्या प्रकाशात मडके वाळत ठेवायचे. सुकल्यावर त्यात पाणी भरायचे.     

पावसाळ्यात पाणी जास्त खराब असते. असे पाणी मडक्यात भरले तर मडक्याला त्यातील दूषित घटक चिकटून राहतात. त्यामुळे मडक्यात पाणी भरतानाही काळजी घ्यावी. पाणी गाळून भरावे. पाण्याचा रंग पाहा आणि मगच पाणी प्यायला वापरा.    

टॅग्स :पाणीहोम रेमेडीआरोग्य