Lokmat Sakhi >Social Viral > काम करताना सारखा आळस येतो? उठसुठ जांभई येते? फक्त आळस नाही 'ही' कारणेही असतात

काम करताना सारखा आळस येतो? उठसुठ जांभई येते? फक्त आळस नाही 'ही' कारणेही असतात

Do you feel lazy while working? Do you yawn all the time? It's not just laziness, there are 'these' reasons too : ऑफीसमध्ये सारखी झोप येत असेल तर या टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 14:20 IST2025-07-15T14:18:29+5:302025-07-15T14:20:34+5:30

Do you feel lazy while working? Do you yawn all the time? It's not just laziness, there are 'these' reasons too : ऑफीसमध्ये सारखी झोप येत असेल तर या टिप्स लक्षात ठेवा.

Do you feel lazy while working? Do you yawn all the time? It's not just laziness, there are 'these' reasons too | काम करताना सारखा आळस येतो? उठसुठ जांभई येते? फक्त आळस नाही 'ही' कारणेही असतात

काम करताना सारखा आळस येतो? उठसुठ जांभई येते? फक्त आळस नाही 'ही' कारणेही असतात

ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत सतत आळस येणे आणि जांभई येणे ही काही समस्या नाही. यामागे शारीरिक तसेच मानसिक कारणे असू शकतात. कामामुळे शरीर थकते फक्त शरीरच नाही तर मनही थकते. त्यामुळे मग आळस व्यक्त करण्यासाठी शरीर अशा कृती करते. (Do you feel lazy while working? Do you yawn all the time? It's not just laziness, there are 'these' reasons too)दिवसाची सुरुवात नीट न झाल्यास किंवा झोप अर्धवट झाल्यावरही संपूर्ण दिवसभर जांभई येत राहते. आळस येणे सहाजिक आहे मात्र जर रोजच आळस येत असेल आणि सतत जांभाई येत असेल तर मग काही उपाय करणे फायद्याचे ठरेल.  

सकाळची सुरुवात ही फार महत्वाची असते. ती आळसावलेली झाली की पुढचा दिवस तसाच जातो. त्यामुळे दिवसाची सुरवात प्रसन्नच करायची. उठल्यानंतर भरपूर पाणी प्यायचे. थोडा व्यायाम करावा. व्यायाम नाहीच तर मग थोडे उभ्याउभ्या स्ट्रेचिंग करायचे. पौष्टिक नाश्ता करायचा. शरीराला आणि मेंदूला आवश्यक ऊर्जेचा पुरवठा चांगल्या अन्नातून होतो. फास्ट फूड खाल्ल्यानंतर थकवा अधिक जाणवतो आणि त्याचा परिणाम म्हणून आळस जाणवतो. त्यामुळे ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा पोहोचल्यावर काही पौष्टिक पदार्थच खा. वातूळ काही खाऊ नका.

ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून काम करताना शरीर स्थिर राहते. हालचाल न झाल्यामुळे सुस्ती येते. रक्ताभिसरण कमी होते आणि त्यामुळे झोप वाढते. दर दोन ते तीन तासांनी खुर्चीतून उठून थोडं फिरणं, हलकी स्ट्रेचिंग करणे,  एक-दोन फेऱ्या मारणे अत्यंत उपयुक्त ठरेल. शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि मेंदूही अधिक कार्यक्षम राहतो.

जांभई येण्याचं आणखी एक महत्वचे कारण म्हणजे, ऑक्सिजनची कमतरता. त्यामुळे ऑफिसमध्ये शक्य असल्यास खिडक्या उघडून हवेशीर वातावरण तयार करा किंवा दर काही वेळांनी ताज्या हवेसाठी बाहेर फेरी मारा. सतत एसीमध्ये बसल्यास मेंदू सुस्त पडतो. खोल श्वास घेण्याचा सराव केल्यासही ऑक्सिजनमध्ये वाढ होऊन तुमचं लक्ष केंद्रीत होण्यास मदत होईल.

झोपेची कमतरता ही आळस येण्याचं एक प्रमुख कारण आहे. रात्री पुरेशी, सलग झोप होणं आवश्यक आहे. जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल, स्क्रीनसमोर खूप वेळ घालवत असाल, तर मेंदू थकतो आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाणवतो. झोपेची वेळ ठरवून त्याचे काटेकोर पालन केल्यास झोप चांगली होते आणि दिवसभर थकवा तसेच आळस जाणवत नाही.

कधी कधी मानसिक कंटाळाही आळशीपणाचं कारण ठरतो. एकाच कामाची पुनरावृत्ती किंवा कामात रस न वाटणे यामुळेही आळस येतो. त्यामुळे कामात थोडं वैविध्य आणा. कामाचे छोटे भाग पाडून घ्या. काही नवीन शिकत राहा. चहा, कॉफीसाठी ब्रेक घ्या.   

कॅफिनचा वापर जपून करा. भरपूर चहा किंवा कॉफी घेतल्याने तात्पुरती तरतरी येते. पण काही वेळाने त्याचा उलट परिणाम होतो आणि थकवा वाढतो. त्याऐवजी फळांचा रस, पाणी, नारळ पाणी यांचा वापर करा. झोप, आहार, शारीरिक हालचाल आणि मानसिक ऊर्जा या चार गोष्टी संतुलित ठेवल्यास ऑफिसमध्ये आळस येणे आणि जांभई येणे या समस्यांवर सहज नियंत्रण मिळवता येते. तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये थोडेसे बदल केल्यास तुम्ही ऑफिसमध्ये अधिक उत्साहाने, कार्यक्षमतेने आणि आनंदाने काम करू शकता.

Web Title: Do you feel lazy while working? Do you yawn all the time? It's not just laziness, there are 'these' reasons too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.