इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे जुगाडचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक देशी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वचजण चक्रावले आहेत. चपाती सपाट होऊ नये, व्यवस्थित फुलावी या प्रयत्नात बरेच लोक असतात.
चपाती फुगवण्यासाठी एक भन्नाट जुगाड केलेला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काहीजण चुल्ह्यावर चपाती शेकतात त्यांना चपाती फुगवायची कशी असा प्रश्न पडतो. चपाती फुगवण्याच्या काही खास ट्रिक्स पाहूया. या व्हिडिओवर बरेचजण प्रतिक्रिया देत आहेत. (Desi Jugaad For Making Roti And Filling air In Chapatis Desi Jugaad Trick Video Goes Viral)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Mr_arbaz_77 या नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही टेक्नोलॉजी इंडियातून बाहेर जायला नको असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलं चुलीजवळ बसले आहेत.
एक मुलगा कच्च्या मातीपासून तयार झालेल्या चुल्ह्यावर तवा ठेवून चपाती शेकत आहेत. त्यानंतर तिथं बसलेला एक मुलगा सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्याचा पंप आणतो आणि त्या पाईपनं चपाती शेकतो आणि हवा भरतो. यामुळे चपाती मऊ होते आणि फुगते पण नंतर पुन्हा आधी होती तशीच होते.
ये टेक्नोलॉजी इंडिया से बाहर नहीं जाना चाहिए..!😂
— 𝐌𝐫 𝐀𝐫𝐛𝐚𝐳❤️🔥 (@Mr_arbaz_77) October 26, 2025
रोटी फुलाने का ये तरीका कैसा लगा आपको...?👇 pic.twitter.com/pYnwjgi5tn
या व्हिडिओवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की आता कोणीच असं बोलू शकत नाही की मुलांना चपात्या फुगवता येत नाहीत. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, न्यु टेक्नोलॉजीमुळे बॅचलर लोकांना मदत होईल. या टेक्नलॉजीचं लवकर पेटंट घ्यायला हवं अशी विनोदी कमेंट एका युजरनं दिली आहे. तर या टेक्नोलॉजीचा वापर करून एक दोन नाही तर बऱ्याच चपात्या फुगवता येऊ शकतात अशीसुद्धा कमेंट आली आहे.
