Join us

भर लग्नात नवरीचा डान्स बघून नवरदेवानं दिली भन्नाट रिॲक्शन; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:08 IST

Desi bride and her friends dance to Ra Ra Rakkamma on wedding day : एका व्हिडीओमध्ये एक नववधू रा रक्कम्मा, किच्चा सुदीपच्या विक्रांत रोना या चित्रपटातील गाण्यावर नाचत आहे.

लग्नसराई आणि लग्नात होणाऱ्या गमती जमतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. व्हिडिओतील काही प्रसंग पाहून खूप हसायला येतं. याच आठवणी कॅमेरात कैद करून नवरा नवरी आपल्या लग्नाची आठवण सांभाळून ठेवतात.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक नववधू  रा रक्कम्मा, किच्चा सुदीपच्या विक्रांत रोना या चित्रपटातील गाण्यावर नाचत आहे. (Desi bride and her friends dance to Ra Ra Rakkamma on wedding day Viral video shows groom’s reaction)

व्हिडिओमध्ये वधू तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या मैत्रिणींसोबत नाचताना दिसत आहे. खरं तर, वर तिच्या पाठीमागे बसला होता आणि डान्स पाहत होता. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही वधू आणि तिच्या मैत्रिणींना या हिट गाण्यावर परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर उठून जाताना पाहू शकता.

सुंदर साडी आणि दागिने परिधान केलेल्या वधूने तिच्या गर्ल गँगसह कमाल परफॉर्मन्स दिला. त्यांनी अर्थातच जोरदार कामगिरी केली. पत्नीला नाचताना पाहून त्याला खूप हसू आले. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. नेटिझन्स वधूच्या दमदार कामगिरीनंतर आपलं हसणं थांबवू शकलेले नाहीत.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल