Join us  

संतापजनक! शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 7:54 PM

Denied entry for wearing shorts girl : महत्वाच्या परिक्षेच्या काही मिनिटांपूर्वी घडलेला हा प्रसंग माझ्या मुलीवर अत्याचार होण्यापेक्षा हे काही कमी नव्हता.

आसामच्या तेजपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मुलीला शॉट्स घालून आल्यामुळे परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला. (Denied entry for wearing shorts girl) अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार शॉर्ट्सवर परिक्षा देणं अनुकूल नाही. तेजपूरमधील गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स हे गुरुवारी दुसऱ्या भागात घेण्यात आलेल्या कृषी प्रवेश परीक्षेचे केंद्र होते. परिक्षेची वेळ २ तासांची होती. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 

या विद्यार्थीनीनं दिलेल्या माहितीनुार, ''मी आपल्या घरून १०:३० वाजता तेजपूर येथे पोहोचले. एका नातेवाईकांच्या घरी फ्रेश झाल्यानंतर मी परिक्षा केंद्रावर पोहोचले. रूटीन चेकिंगनंतर मला गेटजवळ जाऊ दिलं. माझ्याकडे आधारकार्ड, प्रवेशकार्डसह इतर आवश्यक कागदपत्र होती. तरीसुद्धा मला एका बाजूला उभं राहायला सांगितलं. जेव्हा मी कारण विचारलं तेव्हा सांगण्यात आलं की, शॉट्स घालून परिक्षेला बसण्याची परवानगी नाही.''

पुढे तिनं सांगितलं की, ''मी विचारले शॉर्ट्स का घालू शकत नाही. ड्रेस कोडसाठी प्रवेशपत्रात कोणताही नियम नमूद केलेला नाही.  त्यावर एक व्यक्ती मला म्हणाली की, ही साधी गोष्ट तुला कळायला हवी. मग मी त्या माणसाला माझ्या वडिलांशी बोलण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला. नंतर मी माझ्या वडीलांना फूल पॅण्ट आणायला सांगितलं. कारण मला त्यावेळी परिक्षेला बसणं जास्त महत्वाचं वाटत होतं. वडीलांना यायला वेळ लागणार होता. तरीसुद्धा माझं काहीही ऐकून घेतलं नाही.'' 

याबाबत मुलीचे वडील म्हणाले की, ''जेव्हा माझ्या मुलीने पॅण्ट आणण्यासाठी फोन केला तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. वेळ कमी होता आणि इतक्या कमी वेळात पॅण्ट घेऊन केंद्रावर पोहोचणं मला शक्य नव्हतं. तेव्हा तिथल्या लोकांनी माझ्या मुलीला पायांभोवती स्कार्फ गुंडाळायला लावला मग पेपर सोडवायला जाऊ दिलं.

महत्वाच्या परिक्षेच्या काही मिनिटांपूर्वी घडलेला हा प्रसंग माझ्या मुलीवर अत्याचार होण्यापेक्षा हे काही कमी नव्हता. तरी तिनं २०० पैकी १४८ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत मी कधीही अशा अपमानाचा सामना केला नाही, मला परीक्षा केंद्रात शॉट्स घालण्यात काहीही  चूक वाटत नाही.'' 

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारे आसाममधील एक तरुण व्यावसायिक गोस्वामी म्हणाले की,'' देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनीही महिलांच्या कपड्यांच्या लांबीबद्दल काळजी वाटते! महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या कपड्यांच्या लांबीनुसार न्याय करणाऱ्यांशी मला सहानुभूती आहे. अर्थात, त्याच्या विचाराची व्याप्ती दयनीय आहे. " 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाआसाम