Join us

समोर आले पीव्ही सिंधू अन् दीपिकाच्या बॅडमिंटन सामन्याचे फोटो; सांगा पाहू कोण जिंकलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:23 IST

Deepika padukone and pv sindhu : दीपिकाने पीव्हीसोबत बॅडमिंटन खेळतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांच्या खेळाचा व्हिडिओ अप्रतिम आहे. 

दीपिका पदुकोण आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दिवसात दोघांची चांगली मैत्री झालेली दिसून येतेय. दीपिकाने पीव्हीसोबत बॅडमिंटन खेळतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांच्या खेळाचा व्हिडिओ अप्रतिम आहे. 

दीपिकाला लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळायला आवडायचं आणि एथलिट कुटुंबातील असल्यामुळे  तिच्या मनात नेहमीच खेळाविषयी प्रेम होते. दीपिका व्हिडिओमध्ये म्हणते की पीव्हीला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयारी करायची होती आणि तिला वाटते की मी सराव करण्यासाठी सर्वोत्तम जोडीदार आहे.

 

दरम्यान, व्हिडिओमध्ये दीपिकासोबत बॅडमिंटन खेळताना पीव्ही सिंधू सांगते की, जर दीपिकाने बॅडमिंटनला व्यवसाय बनवले असते तर ती अव्वल खेळाडू ठरली असती. व्हिडिओ शेअर करत दीपिकाने कॅप्शन दिले, सांगा कोण जिंकले. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता.

ज्यावर तिने कॅप्शन दिले होते, सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना कॅलरीज बर्न करणे. रणवीर सिंह देखील या दिवसात या दोघांसोबत होता. रणवीरने दीपिका-सिंधूसोबत एक सेल्फी देखील पोस्ट केला होता जो प्रचंड व्हायरल झाला. पीव्ही सिंधू ही भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं.

 दीपिका अभिनेत्री असण्यासोबतच एक एक बॅडमिंटनपटूही असून अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शालेय जीवनात ती बॅडमिंटनपटू असल्याचं सांगितलं होतं. दीपिका सिंधू सोबत बॅडमिंटन खेळताना एका काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी ती तिच्या कॅलरीज बर्न करत असावी अशा कमेंट काही युजर्सनी केल्या आहेत. 

टॅग्स :पी. व्ही. सिंधूदीपिका पादुकोणफिटनेस टिप्ससोशल व्हायरल