Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मेली आणि ८ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली! दुर्धर आजार झालेल्या एका महिलेचा अजब अनुभव

मेली आणि ८ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली! दुर्धर आजार झालेल्या एका महिलेचा अजब अनुभव

Dead and came back to life after 8 minutes! The strange experience of a woman : दुसऱ्या जगात जाऊन आल्याचा दावा करते ही महिला. पाहा काय आहे तिची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 14:48 IST2025-06-11T14:47:19+5:302025-06-11T14:48:24+5:30

Dead and came back to life after 8 minutes! The strange experience of a woman : दुसऱ्या जगात जाऊन आल्याचा दावा करते ही महिला. पाहा काय आहे तिची गोष्ट.

Dead and came back to life after 8 minutes! The strange experience of a woman | मेली आणि ८ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली! दुर्धर आजार झालेल्या एका महिलेचा अजब अनुभव

मेली आणि ८ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली! दुर्धर आजार झालेल्या एका महिलेचा अजब अनुभव

प्रत्येक व्यक्तीची विचारधारणा वेगळी असते. एखाद्या गोष्टीवर कोणाचा विश्वास असतो, श्रद्धा असते तर काही जणांचा त्या गोष्टीवर ना विश्वास असतो ना श्रद्धा. खास म्हणजे अध्यात्म, जन्म, मृत्यू , पुनर्जन्म, देव, दैत्य या संकल्पना सगळ्या धर्मांमध्ये मांडलेल्या आहेत. (Dead and came back to life after 8 minutes! The strange experience of a woman)मात्र त्या कायम वादात्मक असतात.  मृत्यू हा व्यक्तीचा अंत असतो आणि तो कोणाला चुकलेला नाही हे तर सगळ्यांना मान्य आहे. मृत्यू नंतर नक्की काय होते हे कोडे सुटण्यासारखे नाही. मात्र सध्या मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका महिलेची चर्चा सगळीकडे होत आहे. जाणून घ्या नक्की काय घडले.

अमेरिकेत राहणारी ब्रिना लिफर्टी ही ३३ वर्षीय महिला गेली काही वर्षे एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. मायोक्लोनस-डिस्टोनिया हा एक मेंदूची आजार आहे जो फार कमी लोकांना होतो. मात्र फार गंभीर स्वरुपाचा आजार आहे. उपचार चालू असताना ब्रिनाच्या शरीराने साथ सोडली आणि तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मेंदू बंद होता तसेच साऱ्या संस्थाही थांबल्या होत्या असे द मिरर न्यूजने सांगितले आहे. मात्र आठ मिनिटांनी ब्रिना पुन्हा जिवंत झाली आणि तिला त्या आठ मिनिटांमध्ये काय घडले ते सगळे आठवत असल्याचा दावा ती करते आहे. 

ब्रिनाने सांगितले, तिला तिचा आत्मा शरीराच्या बाहेर गेलेला जाणवला तिचा मृतदेह तिने पाहिला आणि ती वेगळ्या जगात गेली. तिथे तिला एक आवाज ऐकू आला. तिला तू तयार आहेस का असा प्रश्न कोणीतरी विचारत असताना आजूबाजूला अंधार झाला. ब्रिनाला हालचाल करता येत नव्हती ती स्थिर होती मात्र फार शांत आणि छान वाटत होते. असे ब्रिना म्हणाली. 

जन्म मृत्यूचा खेळ त्या आठ मिनिटात ब्रिनाला कळला आणि आता तिच्या आयुष्याची दिशा पूर्ण वेगळी आहे. मृत्यूनंतर आजूबाजूला काय घडत आहे हे आपल्याला कळते असा दावाही ब्रिनाने केला आहे. ब्रिनाचे दावे खरे का खोटे?  मृत घोषित झालेली मुलगी पुन्हा कशी जिवंत झाली? तिच्या आजाराचे काय झाले ? तिला खरंच काही आवाज ऐकू आले का? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

Web Title: Dead and came back to life after 8 minutes! The strange experience of a woman