Join us

मायेची फुंकर! रणरणत्या उन्हात बापासाठी लेकीची 'सावली'; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:34 IST

एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. एका चिमुकलीचा तिच्या वडिलांसोबतचा व्हिडीओ लोकांना भावुक करत आहे.

आजकाल सोशल मीडियावर नवनवीन भन्नाट व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. याच दरम्यान एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं आहे. एका चिमुकलीचा तिच्या वडिलांसोबतचा व्हिडीओ लोकांना भावुक करत आहे. रखरखत्या उन्हात बापासाठी लेक सावली झाली. वडिलांना ऊन लागू नये म्हणून चिमुकल्या मुलीची धडपड पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कडाक्याच्या उन्हात एक व्यक्ती सायकल चालवत आहे. कदाचित ते आपल्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठीमागे एक लहान मुलगी उभी आहे, जी शाळेच्या गणवेशात आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे  वडिलांना ऊन लागू नये म्हणून तिने आपल्या दोन्ही हातांनी एक मोठी छत्री धरली आहे.

मुलीची ही निरागस काळजी आणि वडिलांवरील तिचं प्रेम पाहून लोक भावुक झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर imranshah__official नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. तर ४० हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. 

व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट करत आहेत. "मुली खरोखरच देवाचं रूप आहेत" अशी एका युजरने कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने "हा व्हिडीओ नात्यांचं खरं सौंदर्य दाखवतो" असं म्हटलं. सोनेरी क्षण म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओसोशल मीडिया