Join us

आईने दादाला मारलेलं पाहताच धावली चिमुकली आणि रागवत आईलाच म्हणाली... पाहा क्यूट व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 17:15 IST

Viral Video of Cute Little Siblings: लहानशा बहीण- भावामधलं निरागस प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देहा धमाल व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तब्बल पावणेतीन लाख लाेकांनी त्याला लाईक केलं आहे. 

घरात जेव्हा जवळपास सारख्याच वयाची चिमुरडी भावंड ( Little Siblings) असतात, तेव्हा त्यांच्यात भांडणं भरपूर होतात. कधी कधी तर त्यांची भांडणं मारामारीत बदलतात आणि मग ती सोडवता सोडवता त्यांच्या पालकांच्या नाकीनऊ येतात. पण असेही प्रसंग येतात, जेव्हा भावंडांना एकमेकांबाबत असलेलं प्रेम प्रकर्षाने उफाळून येतं. एकमेकांच्या बाजूने ते अगदी भक्कमपणे उभे राहतात आणि प्रसंगी पालकांनाही मग विरोध करतात. भावंडामधलं असंच प्रेम दाखवणारा हा एक व्हायरल व्हिडिओ (Viral Video of Cute Little Siblings). यात बघा छोटीशी बहीण कशी भावासाठी धावत आली आहे. 

 

deepakvetal9538 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुलं लहान असताना साधारणपणे प्रत्येक घरातच हा प्रसंग कधी ना कधी दिसून येतो.

हिरव्यागार मिरचीचं इन्स्टंट झणझणीत लोणचं! हिवाळ्यात गरमागरम जेवणाला येईल खास रंगत, बघा झटपट रेसिपी

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक साधारण ७ ते ८ वर्षांचा भाऊ आहे आणि त्याची बहीण अंदाजे दोन ते अडीच वर्षांची असावी. त्या मुलांची आई मोठ्या भावाला खोटं खोटं रागावते आहे आणि मारते आहे. ते दोघे मिळून त्या छोट्याशा बहिणीची गंमत करत आहेत. आई आपल्या भावाला मारतेय, रागावतेय हे पाहून ती चिमुकली भावाकडे धावत जाते आणि चूप चूप म्हणत आईला रागवायला सुरुवात करते.

 

छोटीशी बहीण रागावलीये ते पाहून मग आई आणि मुलाला आणखीनच उत्साह येतो. भाऊही मग रडायचं नाटक करतो. भाऊ रडतोय म्हटल्यावर तर ही चिमुरडी तिचं खेळणं टाकून देते आणि आईच्या हातातली वस्तू हिसकावून घेते.

"आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ

त्यांची ती लुटूपुटूची मारामारी बिचारीला अगदी खरीच वाटून ती कासावीस होऊन जाते. हा धमाल व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तब्बल पावणेतीन लाख लाेकांनी त्याला लाईक केलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललहान मुलं