विश्वविजेता ठरलेला भारतीय महिला क्रिकेट संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला. यादरम्यान मोदींनी भारतीय संघाचे भरभरून कौतूक केले. याचवेळी गप्पांचा एक अनौपचारिक कार्यक्रम झाला आणि त्याचवेळी खेळाडू हरलीन देओलने पंतप्रधानांना असा काही प्रश्न विचारला की तो ऐकून पंतप्रधान मोदींसह उपस्थित सर्वच चक्रावून गेले. पंतप्रधानांसाठीही तो प्रश्न एवढा बाऊन्सर होता की त्यांनी क्षणभर डोक्यालाच हात मारला..
हरलीनने जो प्रश्न विचारला तो प्रश्न पंतप्रधान मोदींना कदाचितच कोणी विचारला असेल.. माईक हातात घेताच हरलीन म्हणाली की सर तुमचा चेहरा खूप ग्लो करतो आहे, ते पाहूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे.. हे ऐकताच उपस्थित सगळेच हसायला लागले. पंतप्रधान मोदींनाही मनापासून हसू आले. ते पुरते गोंधळून गेले होते. शेवटी स्वत:ला सावरत ते उत्तर देतच होते की या बाबतीत मी असा कधी विचारच केला नाही.... पण तेवढ्यात स्नेह राणा म्हणाली की सर एवढे सगळे लोक तुमच्यावर प्रेम करतात, त्याचीच ही चमक आहे..
स्नेह राणाचे हेच उत्तर मोदींनी उचलून धरले आणि तिला सहमती देत जनतेच्या प्रेमाचाच हा परिणाम असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले की जवळपास २५ वर्षांपासून मला लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत आणि एवढं दिर्घकाळ लोकांचं प्रेम मिळवणं ही मोठी गोष्ट आहे. हरलीनच्या प्रश्नामुळे वातावरणच एकदम बदलून गेलं. खेळाडूकडून आलेल्या एका सामान्य प्रश्नाला मोदींनीही तेवढंच खिलाडूवृत्तीने घेतलं.. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.
#WATCH | Delhi: Cricketer and member of the Champion Indian Cricket team, Harleen Kaur Deol, asks Prime Minister Narendra Modi about his skin care routine.
— ANI (@ANI) November 6, 2025
Prime Minister Narendra Modi says, "I did not pay a lot of attention to this... I've been in government for 25 years now.… pic.twitter.com/deqCTZcCAE
