Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूप घाम येतो-घरात AC नाही? कुलरच्या पाण्यात हा पदार्थ घाला, थंड हवा येईल-हवेशीर राहील घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 12:56 IST

What To Add In Cooler Water For Cool Air : कुलरच्या कुलिंग पॅडवर जास्त गवत जमा होणं, धूळ, घाण जमा होणं, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित न होणं अशावेळी कुलर थंड हवा देत नाही.

उन्हाळ्याच्या (Summer 2026) दिवसांत बरेच लोक एअर कुलरचा वापर करतात कारण हा एक स्वस्त आणि असरदार उपाय आहे. बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की एसी व्यवस्थित कुलिंग करत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत जसजसे तापमान (Heat Wave) वाढते तसे घराच्या आतील वातावरणही उष्ण  होत जाते.  उष्णतेपासून बचावासाठी आणि शरीराला गारवा मिळण्यासाठी लोक एअर कुलरचा वापर करतात. (What To Add In Cooler Water For Cool Air)

काही घरांमध्ये कुलरच्या पाण्यात डाससुद्धा होतात आणि समस्या अधिकच वाढते. एक सोपा आणि एकदम स्वस्त असा उपाय करून तुम्ही  कुलरचं पाणी स्वच्छ ठेवू शकता. इतकंच नाही तर हवासुद्धा चांगली येईल. कुलरच्या पाण्यात कोणते पदार्थ घातल्यानं थंड हवा येते पाहूया. (Cooler Cooling Tips Know What To Add In Cooler Water For Cool Air Alum Benefits)

कुलरमधून अनेकदा  कमी थंड किंवा गरम हवा का येते? (Why Cooler Is Giving Hot Air)

 कुलरमधून खूपच गरम हवा येत असेल तर लोक विचार करतात की कुलर खराब झाला असावा. पण अनेकदा कुलर खराब झालेला नसतो तर दुसरं कारण असतं. कुलरच्या कुलिंग पॅडवर जास्त गवत जमा होणं, धूळ, घाण जमा होणं, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित न होणं, टाकी घाण होणं, वातावरणात जास्त मॉईश्चर, कूलरचा पंपर व्यवस्थित काम करत नाही, अशावेळी कुलर थंड हवा देत नाही.

 कुलरच्या पाण्यात काय घालायचं? (What To Add In Cooler Water For Cool Air)

कुलरच्या पाण्यात तुम्ही तुरटीचा खडा टाकला तर स्वच्छ, ताजी हवा येईल. तुरटीत बरेच क्लिनिंग गुण असतात  जे धूळ, मातीच्या छोट्या छोट्या कणांना खाली बसवतात. ज्यामुळे पाणी साफ होतं. अनेकदा कुलर टँकमध्ये पाणी साचून राहीलं तर दुर्गंध येतो. तुरटीच्या वापरानं तुम्ही हा दुर्गंध कमी करू शकता. घाण पाण्यात किटाणू जास्त वाढतात. तुरटीमुळे किटाणूंची वाढ कमी होते आणि तुरटी पाणी जास्तवेळ चांगले ठेवण्यास मदत करते. कुलरच्या पाण्यात बऱ्याचवेळा डास अंडी खालतात. ज्यामुळे त्यांची संख्या वाढते. तुरटी घातल्यामुळे  पाणी  स्वच्छ राहतं आणि डास वाढण्याची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे डासांची संख्या कमी होऊ शकते.

तुरटी घातल्यानं कुलरची हवा थंड का येते? (Add Alum In Cooler Water  For Cool Air )

तुरटी घातल्यामुळे कुलरमधील पाणी व्यवस्थित साफ होते. जे कुलिंग पॅड्सपर्यंत व्यवस्थित पोहोचते. याचा परिणाम असा की हवा जास्त थंड लागते. पॅड्सवर घाणही जमा होत नाही. ज्यामुळे हवेत ताजेपणा टिकून राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Cooler not cooling? Add this to water for icy air!

Web Summary : Suffering from summer heat? Add alum to your cooler water for cleaner, cooler air. It eliminates odors, prevents mosquito breeding, and ensures efficient cooling by cleaning the pads. A simple, cost-effective solution for a refreshing home environment.
टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्स