घरात झुरळं दिसलं की, जीव अगदी टांगणीला लागतो. कधी एकदाचं त्याला घराबाहेर काढतेय असं होतं. कारण एक झुरळ दिसलं म्हणजे अजून असणारंच. ते एकटं थोडीच घरात येऊन राहतं. (Cockroaches In The House? Try These '6' Remedies)सह कुटुंब सह परिवार घरात प्रवेश करतं. कुठेतरी जाऊन कानाकोपर्यात लपून बसलेली असतात. घरात लहान मुलं असतील तर, अजूनच धोका वाढतो. मुलं घरभर रांगतात. झुरळाच्या शरीरावरून जीवाणू घरभर पसरतात.(Cockroaches In The House? Try These '6' Remedies) बाळांना आजारी पाडतात. मोठ्यांना देखील त्रास होतोच.
१. बोरिक पावडरबोरीक पावडर आणि पीठीसाखर यांचे मिश्रण करून घराच्या कोपर्यांमध्ये ते पसरवा. साखरेसाठी झुरळं बाहेर येतात. पण बोरीक पावडरमुळे घरातून निघून जातात.
२. बेकिंग सोडाबेकिंग सोड्यात थोडी साखर मिक्स करा. आणि कोपर्यातून पसरवा. झुरळं पुन्हा घरात दिसणारच नाहीत.
३. तमालपत्रतमालपत्राची पाने घरात जमिनीवर ठेवा. जिथे-जिथे झुरळं लपून बसू शकतात, अशा सगळ्या ठिकाणी तमालपत्राची पाने ठेवा. तमालपत्राच्या वासाने झुरळं आणि इतर किडे घरात येत नाहीत.
४. कडुलिंबाचे पाणीकडुलिंबाच्या पाण्याने सतत घराची फरशी पुसा. तसेच खिडक्या पुसा असं केल्याने घर स्वच्छ होतं. किडे तसेच झुरळं घरात येतंच नाहीत.
५. पेपरमिंट तेल पेपरमिंटचं तेल पाण्यात घालून त्याचा स्प्रे तयार करा. तो घरात मारत राहा. यामुळे झुरळं घरात येत नाहीत.
६. व्हिनेगरघरात व्हिनेगरचा स्प्रे तयार करून स्प्रे करा. त्यामुळे घरात झुरळं येतंच नाहीत. आठवड्यातून दोन तीनदा तरी जेवण ठेवण्याच्या जागेवर हा स्प्रे करा.