Join us

स्वयंपाकघरातली हात पुसायच्या कपड्यांना घाणेरडा वास येतो? ‘ही’ ट्रिक पाहा, दुर्गंधी कायमची गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:37 IST

Kitchen Towels Cleaning Tips : अनेकदा तर हे किचनमधील कपडे धुवूनही त्यांचा वास जात नाही. आपल्याला सुद्धा अशी समस्या होत असेल तर काही टिप्स फॉलो करू शकता. 

Kitchen Towels Cleaning Tips : घरातील सगळ्यात महत्वाची जागा असते ती म्हणजे किचन. किचनमध्ये इतक्या वस्तूंचा वापर केला जातो, जेवढा कुठेही केला जात नाही. किचनमध्ये ओटा पुसण्यासाठी किंवा भांडी धरण्यासाठी कापडांचा वापर केला जातो. ही कापडं सतत वापरून खूपच तेलकट होतात किंवा मळकट होतात. इतकंच नाही तर यांमधून वासही येऊ लागतो. अनेकदा तर हे कपडे धुवूनही त्यांचा वास जात नाही. आपल्याला सुद्धा अशी समस्या होत असेल तर काही टिप्स फॉलो करू शकता. 

उन्हात ठेवा

सामान्यपणे लोक किचनमध्ये हाती धरायला वापरल्या जाणाऱ्या कापडांकडे फारसं लक्ष देत नाहीत. गॅसचा ओटा पुसून झाला की, ते तसेच ओले ठेवले जातात. त्यामुळे त्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. अशात त्यांमधून दुर्गंधी येऊ लागते. जी दूर करण्यासाठी ही कापडं उन्हात वाळत घालावी. असं केलं तर त्यांच्यातील ओलावा दूर होईल. 

व्हिनेगरही येईल कामात

किचनमधील कापड साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर सुद्धा करू शकता. यासाठी पाण्यात थोडं व्हिनेगर मिक्स करून त्यात कापड 15 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर कापड साबणानं धुवा. असं केल्यास त्यातील बॅक्टेरिया नष्ट होती आणि वासही दूर होईल.

बेकिंग सोडा

किचनमध्ये वापरले जाणारे कापड साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याची देखील वापर करू शकता. यासाठी अर्धा कप बेकिंग सोडा वॉशिंग पावडरमध्ये मिक्स करा आणि त्यात कापड धुवा. असं केल्यास ते साफ होतील आणि त्यांची दुर्गंधी सुद्धा जाईल.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाने देखील किचनमधील कापडांची दुर्गंधी आणि त्यांच्यातील चिकटपणा दूर होण्यास मदत मिळते. यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाकून त्यात कापड भिजवा आणि नंतर साध्या पाण्यानं धुवा. असं केल्यास त्यांची स्वच्छता होईल आणि वासही जाईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स