Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातल्या फाटलेल्या चादरी 'या' पद्धतीनी पुन्हा वापरा; घर दिसेल स्वच्छ-नेटकं आणि खर्चही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:55 IST

या चादरीचा वापर आपण घरगुती स्वच्छतेसाठी उत्तम प्रकारे करू शकतो. चादरीचे छोटे तुकडे कापून घेतल्यास खिडक्यांच्या काचा, फर्निचर किंवा ओटा पुसण्यासाठी उत्तम 'डस्टर' तयार होतात.

घरातील वापरातील चादर जुनी झाली किंवा एखादी जागा फाटली की आपण ती लगेच फेकून देण्याचा विचार करतो. मात्र, ही सुती किंवा मऊ कापडाची चादर फेकून न देता तिचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही करू शकतो. जुन्या चादरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील कापड अनेक वेळा धुतल्यामुळे खूप मऊ झालेले असते, जे घरातील विविध कामांसाठी अत्यंत सोयीचे ठरते. फाटलेल्या चादरीचा तुम्ही अनेक प्रकार वापर करू शकता. ज्यामुळे घरातील इतर सोपी होतील आणि खर्चही वाचेल.

या चादरीचा वापर आपण घरगुती स्वच्छतेसाठी उत्तम प्रकारे करू शकतो. चादरीचे छोटे तुकडे कापून घेतल्यास खिडक्यांच्या काचा, फर्निचर किंवा ओटा पुसण्यासाठी उत्तम 'डस्टर' तयार होतात. ही सुती कापडं पाणी आणि धूळ व्यवस्थित शोषून घेतात. याशिवाय, जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल, तर चादरीच्या चांगल्या भागापासून तुम्ही उश्यांची कव्हर्स, लहान मुलांसाठी झोपाळे किंवा किचनमधील हाताचे रुमाल बनवू शकता. आजकाल बाजारात कापडी पिशव्यांची गरज वाढली आहे; अशा वेळी जुन्या चादरीपासून मजबूत पिशव्या शिवून त्या भाजीपाला किंवा वाणसामान आणण्यासाठी वापरता येतात.

चादरीच्या लांब पट्ट्या कापून त्यांची वेणी गुंफून गोलाकार शिवल्यास एक सुंदर आणि जाड 'डोअर मॅट' किंवा बसण्यासाठी 'आसन' तयार होते. घरामध्ये पाळीव प्राणी असतील, तर त्यांच्या अंथरूणासाठी किंवा सोफ्यावर त्यांचे केस पडू नयेत म्हणून ही चादर संरक्षक कवच म्हणून वापरता येते.

अगदी प्रवासात गाडी पुसण्यासाठी किंवा पिकनिकला गेल्यावर जमिनीवर अंथरण्यासाठीही ही चादर उपयोगी पडते. थोडक्यात सांगायचे तर, कल्पकता वापरली तर जुनी चादर हा कचरा नसून घरातील अनेक गरजा पूर्ण करणारे एक उपयुक्त साधन ठरू शकते. यामुळे टाकाऊ वस्तूंना नवीन जीवन मिळते आणि घराची शोभाही वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Repurpose Old Bed Sheets: Smart Ways to Save Money & Decorate

Web Summary : Don't discard old bedsheets! Reuse them for cleaning, crafting, pet care, or even travel. Cut into cloths, sew bags, or weave mats. Creative reuse saves money and reduces waste.
टॅग्स :सुंदर गृहनियोजन