उन्हाळा सुरू झाला की गार पाणी पिण्यासाठी अनेक घरांमध्ये मातीचा माठ हमखास वापरला जातो. मातीच्या माठात ठेवलेलं पाणी नैसर्गिकरीत्या थंड होतं आणि ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी पिणं अनेकांना जास्त आवडतं. माठातील पाणी केवळ नैसर्गिकरित्या थंड होत नाही, तर त्यातील मातीचे गुणधर्म पाण्याचा पीएच (pH) समतोल राखण्यासही मदत करतात. म्हणूनच अनेक घरांमध्ये आजही फ्रिजपेक्षा माठातल्या पाण्याला अधिक पसंती दिली जाते(avoid these mistakes while storing water in clay pot).
माठातील पाणी केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा देते. पण, ज्या मातीच्या माठाला आपण आरोग्यासाठी फायदेशीर समजतो, तोच माठ जर अस्वच्छ असेल, तर त्यात आरोग्यासाठी हानिकारक असे विषाणू वाढायला वेळ लागत नाही. यासाठीच मातीचा माठ वापरताना योग्य स्वच्छतेची आणि काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेच असत. अस्वच्छ मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने पोटाचे विकार, संसर्ग किंवा इतर आरोग्याच्या (mistakes to avoid while using clay pot for water) समस्या उद्भवू शकतात. पाणी साठवणं वाटत तितकं सोपं नसून, आपण कळत - नकळतपणे ५ अशा चुका करतो ज्या आपल्या आरोग्यावर बेतू शकतात. अशाच ५ महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात, ज्या माठात पाणी साठवताना कधीही विसरता कामा नयेत...
माठात पाणी भरुन ठेवताना करु नका ५ चुका...
१. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या :- दर २ ते ३ दिवसांनी माठ रिकामा करून केवळ स्वच्छ पाण्याने नीट घासून धुवावा. माठ धुण्यासाठी कधीही साबण किंवा डिटर्जंटचा वापर करू नका, कारण मातीची छिद्रे ही रसायने शोषून घेऊ शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. माठ बाहेरून स्वच्छ करताना कधीही खरखरीत घासणी वापरू नका. त्याऐवजी जाड मीठ (Sea Salt) लावून हलक्या हाताने घासा. यामुळे माठाची छिद्रे मोकळी राहतात आणि पाणी जास्त थंड होते.
फक्त २१ दिवस मुलांवर ओरडू नका ! दिसतील ३ बदल, करून तर पाहा 'हा' छोटासा प्रयोग...
२. हाताचा थेट संपर्क टाळा :- माठातून पाणी काढण्यासाठी कधीही थेट हात किंवा ग्लास माठात बुडवू नका. पाणी काढण्यासाठी नेहमी लांब दांड्याच्या पळीचा वापर करा किंवा नळ असलेला माठ खरेदी करा. यामुळे पाण्यात बॅक्टेरिया जाण्याचा किंवा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.
३. योग्य जागेची निवड :- माठ कधीही थेट सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवू नका. उन्हामुळे पाणी तर गरम होईलच, पण मातीच्या नैसर्गिक गुणधर्मांवरही परिणाम होतो. माठ घराच्या सर्वात थंड आणि सावलीच्या कोपऱ्यात ठेवणे सर्वोत्तम असते. याशिवाय, माठाभोवती ओले सुती कापड किंवा गोणपाट गुंडाळल्याने बाष्पीभवन अधिक चांगले होते, ज्यामुळे पाणी जास्त काळ गारेगार आणि शुद्ध राहते.
उन्हाळ्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे शिक्षा, १० टिप्स- किचन राहील थंड-घामाघुम न होता करा स्वयंपाक...
४. जुना माठ बदला :- मातीच्या माठाचे देखील ठराविक आयुष्य असते. काळानुसार माठाची सूक्ष्म छिद्रे बंद होतात, ज्यामुळे पाणी थंड होण्याचे प्रमाण कमी होते. उत्तम आरोग्य आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी नवीन माठ घेणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
५. झाकणाची स्वच्छता :- अनेकदा आपण माठ तर स्वच्छ करतो, पण त्याच्या झाकणाकडे दुर्लक्ष करतो. माठावर नेहमी असे झाकण किंवा ताट ठेवा जे पूर्णपणे 'फिट' बसेल, जेणेकरून धूळ-माती किंवा कीटक पाण्यात जाणार नाहीत.
Web Summary : Clay pot water is naturally cool and healthy. Clean it regularly with salt, avoid direct contact, store in a cool place, replace annually, and keep the lid clean to prevent contamination and health issues.
Web Summary : मिट्टी के बर्तन का पानी प्राकृतिक रूप से ठंडा और स्वास्थ्यवर्धक होता है। इसे नियमित रूप से नमक से साफ करें, सीधे संपर्क से बचें, ठंडी जगह पर रखें, हर साल बदलें और दूषित होने से बचाने के लिए ढक्कन को साफ रखें।