Join us

पहिल्यांदाच बदाम खाऊन पाहिले अन् खारूताईनं दिली ‘अशी’ भन्नाट रिॲक्शन, पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:58 IST

Chipmunk's reaction : व्हिडिओ जवळजवळ ४ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून  खारूताईच्या प्रतिक्रियेवर लोक हसणे थांबवू शकले नाहीत.

रोज सकाळी बदाम खाल्ल्यानं तब्येतीला फायदा होतो म्हणूनच आपल्यापैकी अनेकजण सकाळी बदाम खातात. पण तुम्ही खारूताईला बदाम खाताना कधी पाहिलंय का? (Chipmunk's Viral Video) सोशल मीडियावर बदाम खात असलेल्या एका खारूताईचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही प्राण्यांचे क्यूट, मनोरंजनात्मक अनेक व्हिडिओज पाहिले असतील पण असा व्हिडिओ पाहिला नसेल. हे दृश्य पाहून  नेटिझन्सचा चेहरा आनंदानं फुलला आहे. (Chipmunks reaction after having an almond for the first time viral video)

Buitengebieden द्वारे Twitter वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका माणसानं हातात ठेवलेले बदाम खाऊताई पहिल्यांदाच खाते. नंतर शक्य तितके बदाम  आपल्या तोंडात ठेवण्याचा प्रयत्न ती करते. खारूताई प्रथमच बदाम चाखत आहे, असं कॅप्शन या व्हिडियोला  दिलं आहे.

बोंबला! या बाईनं माकडालाच भाजी निवडायला बसवलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओ जवळजवळ ४ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून  खारूताईच्या प्रतिक्रियेवर लोक हसणे थांबवू शकले नाहीत. या व्हिडिओवर कमेंट्स आणि शेअर्सचा वर्षाव होत आहे. याआधीही एका तहानलेल्या खारूताईचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एका लहानश्या बॉटलमधून पाणी पिण्याचा प्रयत्न करणारी खारूताई दिसली होती. लाखो लोकांनी त्या व्हिडिओला पसंती दर्शवली होती.  गणिताच्या टिचरला 'बकरी' म्हणायचे विद्यार्थी, त्यांनी सांगितलेलं कारण ऐकून शिक्षिकेच्या डोळ्यात आलं पाणी..

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया