खाणे पिणे या सजीवांच्या मुलभूत गरजा आहेत. शरीराला अन्नाची गरज असते पाण्याची गरज असते तसेच शरीराला झोपेची गरज असते. (Can't sleep at night? Change these 3 habits immediately)योग्य झोप घोणाऱ्याला आपण आळशी म्हणतो मात्र माणसाला ८ तासाची झोप आवश्यक असते. त्यापेक्षा जास्त झोपू नका मात्र त्यापेक्षा कमीही झोपू नका. आठ तासाची झोप म्हणजे रात्रीची आठ तासांची झोप गरजेची आहे. त्यामध्ये दुपारी संध्याकाळी झोपलात तर त्याचा समावेश होत नाही. तसेच झोपायची वेळ काय आहे त्याचाही परिणाम होतो. आजकाल १२ वाजेपर्यंत जागणे अगदीच कॉमन आहे. (Can't sleep at night? Change these 3 habits immediately)रात्री दोन-ती वाजेपर्यंत जागणे शरीरासाठी चांगले नाही. आरोग्य बिघडू शकते.
काहींना रात्रीचा झोपच लागत नाही. झोप न येणे हा एक मानसिक आजाराचा भाग आहे. मात्र काहींना कोणत्याही त्रासामुळे नाही तर सवयींमुळे झोप लागत नाही. त्या सवयी बदल्यावर वेळेवर झोप नक्कीच लागेल. काही मुद्दाम उशीरा झोपतात. शरीराची प्रक्रिया सुरळीत होत नाही. रात्री योग्य वेळेतच झोपा आणि सकाळी योग्य वेळेतच उठा.
१. आजकाल मोबाइलचे लोकांना वेडच लागले आहे. मोबाइलवर मनोरंजनासाठी अनेक पर्याय आहेत. रात्री खाटेवर पडल्यानंतर हातात मोबाइल घेतल्यावर तास दोन तास कधी जातात ते वापरणाऱ्यालाही कळत नाही. त्यामुळे झोपताना मोबाइल वापरणे बंद करा. त्याऐवजी काहीतरी वाचा. पुस्तक वाचल्याने अनेकांना चांगली झोप येते.
२. रात्री कॉफी पिण्याची अनेकांना सवय असते. कॅफेन झोप उडवते. त्यामुळे नाईट शिफ्ट करणारे किंवा ड्रायव्हिंग करणारे कॉफी पितात. कॉफी प्यायल्यानंतर त्याचा परिणाम २ ते ३ तास तरी राहतो. त्यामुळे संध्याकाळी ६ नंतर कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी दूध प्या. जायफळ घालून प्यायलात तर झोपही मस्त लागेल.
३. दिवसभर जर आराम मिळत असेल तरी रात्री झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर क्रियाशील राहणे गरजेचे असते. शरीराला कार्यरत ठेवले तरच शरीराला झोपेची गरज भासेल त्याशिवाय झोप येणार नाही. ऑफीसमध्ये बैठे काम करणाऱ्यांनी व्यायाम करायलाच हवे.
यापैकी काही सवयी नसतील तर मग वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. झोप न येण्यामागे अनेक वैद्यकीय कारणेही असू शकतात.