Join us

Bull Attack On Woman : रस्ता पार करणाऱ्या महिलेला एकाचवेळी २ बैलांनी दिली धडक; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:43 IST

Bull attack on woman slammed her on road : एक बैल रस्त्यावर उभा असतो आणि ती महिला रस्ता पार करण्यासाठी पुढच्या दिशेने येते.

लोक अनेकदा रस्त्यावर जनावरांना मोकळे सोडतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना  समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा हे प्राणी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करतात. त्यामुळे लोक जखमी होतात तर कधी जीव वाचणंही कठीण होतं. वाटेने जाणार्‍या माणसांमुळे जनावरांना कोणतीही इजा होत नसली तरी हे प्राणी कधी कधी मानवासाठी जीवघेणे ठरतात. (Bull attack on woman slammed her on road in rajasthan cctv footage goes viral)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, एक बैल रस्त्यावर उभा असतो आणि ती महिला रस्ता पार करण्यासाठी पुढच्या दिशेने येते. त्याचवेळ बैल रस्त्यावर येऊन त्या महिलेला जोरदार धडक देतो. यावेळी तिसरा बैल देखील तिथे येतो. या सगळ्यात महिलेचा काहीही दोष नसताना तिला बैलाच्या धडकेमुळे गंभीर दुखापत होते. 

अभ्यास करत नाही म्हणून आईनं धोपटलं; पप्पांनी 'का रडतोस', असं विचारलं तर लेक म्हणाला....

ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून कॅप्शननुसार हा व्हिडिओ राजस्थानचा असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया